विधायक

वानप्रस्थाश्रमातील आजोबांचे जनसेवा विकास समितीच्या कार्यकर्त्यांनी केले अंत्य संस्कार….

वानप्रस्थाश्रमातील आजोबांचे जनसेवा विकास समितीच्या कार्यकर्त्यांनी केले अंत्य संस्कार….

महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी
तळेगाव दाभाडे : येथील वानप्रस्थाश्रमातील आजोबांचे जनसेवा विकास समितीच्या कार्यकर्त्यांनी अंत्यसंस्कार पार पाडले. 

यशवंत नगर परिसरातील वानप्रस्थाश्रम या वृद्धाश्रमातील सदस्य विनायक दत्तात्रय वर्तक यांचा कोव्हिड 19 या आजाराने युनिक हॉस्पिटल तळेगाव स्टेशन येथे दुर्दैवी मृत्यू झाला. वानप्रस्थाश्रम तळेगावच्या संचालिका व सामाजिक कार्यकर्त्या उर्मिलाताई छाजेड या स्वतः कोव्हिड 19 या आजाराने ग्रस्त असल्याने हॉस्पिटलमधील प्रक्रिया पूर्ण करणे व या आजोबांचे अंत्यसंस्कार करण्याबाबतचा मोठा प्रश्न उर्मिलाताई छाजेड यांचे पुढे उपस्थित झाला होता.

उर्मिलाताई छाजेड यांनी सदर बाब जनसेवा विकास समीतीचे अध्यक्ष किशोर आवारे यांना सांगितली. किशोर आवारे यांनी क्षणाचाही विलंब न करता युनिक हॉस्पिटलमध्ये जाऊन दिवंगत रुग्णाबाबत डॉ. विजय इंगळे यांच्या कडून सविस्तर माहिती घेतली व पुढील कार्यवाही करण्या बाबत मिलिंद अच्युत यांना सूचना दिल्या.

किशोर आवारे व जनसेवा विकास समितीच्या कार्यकर्त्यांनी सर्व सोपस्कार पार पाडून दिवंगत आजोबांचे रात्री उशिरा अंत्यसंस्कार केले. किशोर आवारे गोरगरीब लोकांची सेवा अहोरात्र करत आहेत हीच आमच्या कार्यकर्त्यांची खरी प्रेरणा आहे, असे मिलिंद अच्युत यांनी या वेळी सांगितले.
०००००

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 23 Aug 2026

शनिवार, २२ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

1 day ago

MahaBulletin — 22 Aug 2026

शुक्रवार, २१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

2 days ago

MahaBulletin — 20 Aug 2026

मंगळवार, १८ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 5 बातम्या 📰 चाकण…

4 days ago

MahaBulletin — 18 Aug 2026

सोमवार, १७ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

6 days ago

MahaBulletin — 17 Aug 2026

रविवार, १६ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

1 week ago

MahaBulletin — 16 Aug 2026

शनिवार, १५ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 5 बातम्या 📰 चाकण…

1 week ago

This website uses cookies.