चाकण : वाकी खुर्द मधील सुंबरेनगर येथे पुणे-नाशिक महामार्गावर भरधाव दुचाकीने पाठीमागून तीन महिलांना धडक देऊन झालेल्या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला.
सखूबाई नामदेव धामणे (वय ६५, रा. संभाजीनगर, ता. खेड) असे अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. कल्पना सुनील पिंगळे (वय २८) आणि सान्वी पिंगळे या दोघी गंभीर जखमी झाल्या आहेत. याप्रकरणी अक्षय ब्रह्मस्वरूप चतुर्वेदी (रा. रोहकल फाटा, ता. खेड, मूळ रा. उत्तर प्रदेश) याला चाकण पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सखूबाई, कल्पना आणि सान्वी या तिघी पुणे-नाशिक महामार्गावरून सुंबरेनगर येथून पायी चालत जात होत्या, त्या वेळी आरोपी अक्षय हा त्याच्या दुचाकी ( क्रमांक यूपी ५० – जीके ६८१५) वरून भरधाव वेगाने आला. त्याने तिघींना पाठीमागून जोरात धडक दिली. त्यामध्ये तिघी गंभीर जखमी झाल्या. त्यातच सखूबाई यांचा मृत्यू झाला.
शनिवार, १६ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पिंपरी…
रविवार, १० मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 चाकण…
शनिवार, ९ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 वृद्धेचा…
शुक्रवार, ८ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 बिबट्याची…
बुधवार, ६ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 एमआयडीसीतील…
मंगळवार, ५ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 बालकावर…
This website uses cookies.