महाबुलेटीन न्यूज
राजगुरूनगर : खेड तालुक्याचे सुपुत्र वाकळवाडी गावचे भुषण सुधीर दिनकरशेठ वाळुंज यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत घेण्यात आलेल्या पोलिस उपनिरीक्षक पदी निवड झाली आहे.
लहानपणापासुनच हुशार, जिद्दी असणाऱ्या सुधीरने शेतात काम करणे, जनावरे राखणे अशी कामे करत मेहनत व चिकाटीने अभ्यास करून पोलिस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली.
रक्तातच सामाजिक व राजकीय पाश्वभूमी असलेले वडील वाकळवाडी गावचे माजी सरपंच, चेअरमन तर आई माजी ग्रामपंचायत सदस्य, तरी देखील प्रशासनात आधिकारी होण्याचे लहान पणापासुनचे स्वप्न होते. १२ वी मध्ये असताना देखील खेड तालुक्यातून तिसरा येण्याचा मान मिळविला होता. सुधीरने कष्टाच्या जोरावर स्पर्धा परिक्षेचा अभ्यास पुण्यात सुरू केला सन २०११ मध्ये पोलिस दलात पोलिस अंमलदार म्हणुन भरती झाले पण आधिकारी होण्याचे स्वप्न स्वस्थ बसु देत नव्हते म्हणून त्यांनी २०१७ मध्ये पुन्हा परिक्षा देऊन पोलिस उप निरीक्षक पदी निवड झाली आणि आधिकारी होण्याचे स्वप्न साकार झाले.
——
सोमवार, ८ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 गुन्हेगारीवर…
रविवार, ७ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 खेडमध्ये…
शनिवार, १६ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पिंपरी…
रविवार, १० मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 चाकण…
शनिवार, ९ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 वृद्धेचा…
शुक्रवार, ८ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 बिबट्याची…
This website uses cookies.