महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी
राजगुरूनगर : येथील ग्रामीण रुग्णालयातील प्रयोगशाळा सहाय्यक व चांडोली येथील कोविड सेंटरला गेल्या सहा महिन्यापासुन उत्कृष्ट कोविड योद्धा म्हणुन काम करणारे डॉ. योगेश कांबळे ( वय ४४ ) यांचे सोमवारी ( दि. ७ सप्टेंबर ) रात्री साडे आठच्या सुमारास पुणे-नासिक महामार्गावर संतोषनगरच्या हद्दीत अपघाती निधन झाले. चांडोलीवरुन आपले कर्तव्य बजावुन जात असताना हि दुदैवी घटना घडली आहे. त्यांच्यामागे वडील, पत्नी, दोन मुले, बहीण, भाऊ असा परिवार आहे.
कोविड सेंटरला येणाऱ्या गोरगरिबांना चांगल्या पद्धतीचे उपचार मिळावे व त्यांना रहाण्याची खाण्याची काळजी घेणे, अगदी सकाळपासुन रात्री उशिरा पर्यंत प्रत्येक रुग्णाबरोबर फोनवर बोलुन काय त्रास आहे का, काय औषध घ्यावं याची माहिती घेत असे. कांबळे यांच्या अपघाती निधनामुळे एक कोविड योद्धा गमावला आहे असून खेड तालुक्यात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
—
रविवार, ६ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 कामगार…
शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…
सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…
रविवार, ३० ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघातांची…
This website uses cookies.