महाबुलेटीन न्यूज
चाकण : अज्ञात वाहनाने एका दुचाकीला जोरात धडक दिली. त्यामध्ये दुचाकीस्वार रस्त्यावर पडून त्याचा मृत्यू झाला. हा अपघात शनिवारी (दि. १६) रात्री पावणेअकरा वाजता पुणे-नाशिक महामार्गावर कुरुळी (ता. खेड) येथे घडला. संतोष रामदास बाळसराफ (वय ४०, रा. कडाचीवाडी चाकण) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वराचे नाव आहे. याप्रकरणी रोहित सुनील पांढरकर (वय २९, रा. चाकण) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रोहित यांचे दाजी संतोष हे दुचाकीने (एमएच १४ जीई ३८०१) नाशिक महामार्गावरून पिंपरी येथून चाकण येथे घरी जात होते. कुरुळी येथे त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. त्यात ते गंभीर जखमी झाले. गंभीर जखमी झालेल्या संतोष यांचा मृत्यू झाला.
शनिवार, १६ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पिंपरी…
रविवार, १० मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 चाकण…
शनिवार, ९ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 वृद्धेचा…
शुक्रवार, ८ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 बिबट्याची…
बुधवार, ६ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 एमआयडीसीतील…
मंगळवार, ५ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 बालकावर…
This website uses cookies.