महाबुलेटीन न्यूज : दिवाळी उत्साहात साजरी झाली, आता तुळशी विवाह नंतर असून लगीनसराई सुरु होणार आहे. यासाठी दिवाळीनंतरही बाजार फुलला आहे. आता लग्नसराईत पुन्हा बाजार तेजीत राहणार आहेत. कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांत लग्नसराईत बाजारपेठेत मंदी होती. आता दिवाळी व यापूर्वी असलेल्या गणपती, नवरात्रोत्सव, दसऱ्यात ही मंदी काहीशी धुवून निघाली.
यंदा २६ नोव्हेंबरपासून लग्नसराईला सुरवात होत असून मार्च अखेरपर्यंत तब्बल ३१ मुहूर्त आहेत. नंतरच्या चैत्र महिन्यात म्हणजेच एप्रिल २०२३ मध्ये गुरूचा अस्त असल्याने एकही विवाह मुहूर्त नाही. मात्र मे व जून महिन्यातही २६ मुहूर्त आहेत. एकंदरीत यंदा नोव्हेंबर ते जून दरम्यान तब्बल ५७ विवाह मुहूर्त आहेत. त्यामुळे दिवाळीनंतर लग्नसराईत बाजाराला पुन्हा झळाळी येईल.
५ नोव्हेंबरपासून ८ नोव्हेंबरपर्यंत तुळशी विवाह पार पडल्यानंतर यंदाच्या लग्नसराईतील पहिलीच तिथी २६ नोव्हेंबर आहे. तेव्हापासून जूनपर्यंत तब्बल ५७ विवाह मुहूर्त आहेत. यापैकी नोव्हेंबर ते मार्च दरम्यान ३१ आणि मे ते जून दरम्यान २६ मुहूर्त आहेत. त्यातही गतवर्षीप्रमाणे फेब्रुवारी, मे व जून या तीन महिन्यांत सर्वाधिक मुहूर्त आहेत.
“यंदा चैत्र महिन्यात (एप्रिल) गुरूचा अस्त असल्याने मुहूर्तनाहीत. गेल्या दोन वर्षांत कोरानाच्या काळातही लग्न सोहळे पार पडले. मात्र, वेगवेगळे निर्बंध असल्याने मोठे विवाह खोळंबले होते. अशा कार्यांना यंदा मुहूर्त मिळेल. आपत्कालीन मुहूर्त साधता येतील. मुहूर्तावर विवाह धुमधडाक्यात संपन्न होतील,” असे गुरुजींचे मत आहे.
लग्नसराईत मंगल कार्यालय, बँड, वाजंत्री, सराफा बाजार, इलेक्ट्रॉनिक्स, कपडे, ऑटोमोबाईल आदी मोठ्या क्षेत्रासह घोडा, बग्गी, पुरोहित, हार–फुले सजावट, मंडप, ब्युटी पार्लर, फोटोग्राफी–व्हिडीओ शूटिंग, रुखवत सजावट, डेकोरेशन, निवेदक, ऑर्केस्ट्रा–मनोरंजनआदी सर्वच क्षेत्रांना झळाळी येईल. आतापासून मंगल कार्यालय, हॉल व अन्य बुकिंग सुरु झाले आहे. यासोबतच बाजारात खरेदीचेप्रमाण वाढेल. त्यामुळे व्यापाऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. सराफा बाजार, कपडे, किराणा या माध्यमातून मोठी उलाढाल होते. लहानमोठ्या व्यावसायिकांना देखील चांगला रोजगार मिळतो.
0000
रविवार, २६ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 काळुस…
शनिवार, २५ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 राजकीय…
शुक्रवार, २४ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
गुरुवार, २३ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 आरटीई…
मंगळवार, २१ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🌾 निवृत्त…
सोमवार, २० एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 सिद्धेश्वर…
This website uses cookies.