पुणे जिल्हा

महाबुलेटीन न्यूज : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सिंधी बांधवाना नागरिकत्व प्रमाणपत्रांचे वितरण, पिंपरी चिंचवडच्या प्रगतीत सिंधी बांधवांचे मोठे योगदान : उपमुख्यमंत्री अजित पवार

महाबुलेटीन न्यूज 
पुणे, दि. 5 : देशाच्या फाळणीमध्ये सिंधी समाजाने आपले सर्वस्व गमावले. परंतु खचून न जाता स्वत:च्या कर्तबगारीवर त्यांनी व्यापारात जम बसवला. पिंपरी-चिंचवडच्या प्रगतीमध्ये सिंधी समाजाचे मोठे योगदान आहे, असे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्हयाचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज काढले.

भारतीय नागरिकत्व अधिनियम 1955 अन्वये सर्कीट हाऊस, पुणे येथे सिंधी बांधवांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते नागरिकत्व प्रमाणपत्र वितरण करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार आण्णा बनसोडे, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.जयश्री कटारे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे नगरसेवक हिरानंद आसवानी उपस्थित होते.

“उद्योगनगरी म्हणून पिंपरी-चिंचवडची राज्यभर ओळख आहे. पिंपरी-चिंचवडच्या आर्थिक उलाढालीमध्ये सिंधी समाजाचा मोठा वाटा आहे. अतिशय विनम्रपणे हा समाज राहतो. शहरातील नागरिकांना, मूळ रहिवाशांना त्यांचा कधीच त्रास होत नाही”, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. नागरिकत्वासाठी सिंधी बांधवांचे 215 प्रस्ताव प्राप्त होते, त्यापैकी आज अखेर 136 जणांना नागरिकत्व प्रदान करण्यात आले आहे. प्रलंबित प्रस्तावावर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून तातडीने पाठपुरावा करण्याचा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी दिल्या.
——

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 15 Jun 2026

रविवार, १४ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ भीमाशंकर…

5 hours ago

MahaBulletin — 14 Jun 2026

शनिवार, १३ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पुण्यात…

1 day ago

MahaBulletin — 13 Jun 2026

शुक्रवार, १२ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 गायरान…

2 days ago

MahaBulletin — 12 Jun 2026

गुरुवार, ११ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 विषारी…

3 days ago

MahaBulletin — 11 Jun 2026

बुधवार, १० जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 दारूकांडानंतर…

4 days ago

MahaBulletin — 10 Jun 2026

सोमवार, ८ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 गुन्हेगारीवर…

5 days ago

This website uses cookies.