प्रशासकीय

अनलॉक 4 चा आदेशलागू : शाळा बंदच, मेट्रो ट्रेन सुरु, तर ई-पास रद्द

 

मेट्रो सुरू

महाबुलेटीन न्यूज नेटवर्क
मुंबई, दि. 29 ऑगस्ट : कोरोना प्रादुर्भावामुळे लागू करण्यात आलेले निर्बंध (Lockdown) आता आणखी शिथिल होणार आहेत. Unlock 4.0  संदर्भात नवीन नियम केंद्र सरकारने (Unlock 4.0 guidelines) जारी केले आहेत. येत्या 1 सप्टेंबरपासून लॉकडाऊनचे नियम आणखी शिथिल होतील.

एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जायला आता मुभा असेल. तसंच राज्यांतर्गत प्रवासासाठीही वेगळी परवानगीची आवश्यकता नाही, असं केंद्र सरकारच्या गाईडलाईन्स सांगतात. या नव्या नियमांमध्ये 30 सप्टेंबरपर्यंत शाळा बंदच राहतील, असं सांगण्यात आलं आहे. मेट्रो मात्र 7 सप्टेंबरपासून सुरू करता येऊ शकेल, असं केंद्र सरकारने सांगितलं आहे.


शाळा बंद असल्या तरी अनलॉक 4.0 मध्ये नववीच्या वरच्या वर्गातल्या विद्यार्थ्यांना त्यांना आवश्यकता असेल तेव्हा शाळेत जायची परवानगी देण्यात आली आहे. एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जायला आता E-pass किंवा परवानगीची आवश्यकता नाही.

 

असे आहेत नवे नियम :-
————–
– थिएटर, मनोरंजन केंद्र, स्विमिंग पूल राहणार बंद
– शाळा बंदच, पण एका वेळी 50 टक्क्याहून कमी शिक्षकांना शाळेत बोलवायला परवानगी
– ऑनलाईन शिक्षणासंदर्भात कामासाठी निम्मे शिक्षक शाळेत जाऊ शकतात.
– नववी ते बारावी च्या विद्यार्थ्यांना त्यांना आवश्यकता असेल त्यावेळी पालकांच्या लिखित पूर्वपरवानगीसह शाळेत यायला परवानगी.
– शिक्षकांकडून मार्गदर्शन, पुस्तकं किंवा इतर साहित्य घेण्यासाठी माध्यमिक – शाळेतले विद्यार्थी पालकांच्या परवानगीने शाळेत शिक्षकांना भेटायला जाऊ शकतात.
——–

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 13 May 2026

रविवार, १० मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 चाकण…

13 hours ago

MahaBulletin — 10 May 2026

शनिवार, ९ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 वृद्धेचा…

4 days ago

MahaBulletin — 09 May 2026

शुक्रवार, ८ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 बिबट्याची…

5 days ago

MahaBulletin — 07 May 2026

बुधवार, ६ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 एमआयडीसीतील…

7 days ago

MahaBulletin — 06 May 2026

मंगळवार, ५ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 बालकावर…

1 week ago

MahaBulletin — 05 May 2026

सोमवार, ४ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 बालकांवरील…

1 week ago

This website uses cookies.