महाबुलेटीन न्यूज : शैलेश काटे
इंदापूर : उजनी धरणाच्या वरील धरणक्षेत्रात पडलेल्या पावसाचे पाणी वाहून भीमा नदीत येवू लागल्याने उजनी पाणलोट क्षेत्रातील पाण्याची पातळी वाढू लागली आहे.
पावसाळा सुरु झाल्यापासून उजनी पाणलोट क्षेत्रात पावसाचे पाणी वाहून येत होते. त्या प्रमाणात पाण्याच्या पातळीत वाढ होती. दोन दिवसांपासून पाणी मोठ्या प्रमाणात येवू लागले. त्यामुळे नदीकाठावरील पाण्यात बुडालेल्या विद्युत मोटारी पाण्याबाहेर काढण्याची शेतक-यांची लगबग सुरु झाली आहे. मासेमारांना पाणी वाढल्याचा फायदा होवू शकतो, या संदर्भात बोलताना माश्यांचे आडत व्यापारी दत्तात्रय व्यवहारे यांनी सांगितले की,पाणी वाढत असल्याच्या कालावधीत चांगल्या प्रमाणात मासे ही वाहून येतात. पाणी स्थिर झाल्यानंतर मासे वाहून येण्याचे प्रमाण मंदावते.
—–
सोमवार, ८ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 गुन्हेगारीवर…
रविवार, ७ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 खेडमध्ये…
शनिवार, १६ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पिंपरी…
रविवार, १० मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 चाकण…
शनिवार, ९ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 वृद्धेचा…
शुक्रवार, ८ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 बिबट्याची…
This website uses cookies.