तृतीयपंथी यांना मंथन फाउंडेशनची साथ, ४० तृतीयपंथीयांना किराणा साहित्य वाटप

महाबुलेटीन नेटवर्क
पुणे : लॉकडाऊन मुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या तृतीयपंथीयांना मंथन फाउंडेशनच्या वतीने किराणा साहित्य वाटप करण्यात आले.
मंथन फाउंडेशन दुर्लक्षित, दुर्बल घटकांसाठी गेली अनेक वर्ष काम करत आहे. सध्याच्या कोरोना काळात देखील मंथन फाउंडेशनचे सर्व कार्यकर्ते कुठीलीही भीती न बाळगता, सर्व काळजी घेऊन अविरत काम करीत आहेत.
तृतीय पंथी अर्थात ज्यांना समाज हिजडा वा किन्नर म्हणून ओळखतो, यांच्याबद्दल नेहमीच समाजामध्ये तिरस्कार व नावडती भावना राहिलेली आहे. तृतीयपंथी यांचे मुख्य काम म्हणजे रोडवर पैसे मागणे. लॉक डाऊनच्या कालावधीमध्ये या सर्वांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागले. दुर्लक्षित असल्यामुळे त्यांच्या पर्यंत मदतीचा ओघ पोहचलाच नाही.
मंथन फाउंडेशन संस्थेने हमसफर ट्रस्टच्या सहकार्याने ४० तृतीय पंथी यांना महिना भर पुरेल इतके रेशन देण्यात आले. यामध्ये  गव्हाचे पीठ, तांदूळ, डाळ, साखर, चहा पावडर, हळद, तिखट, मीठ, तेल, कपडे, आंघोळीचा साबण, डिटर्जंट, कांदा, बटाटा व हँड सॅनिटायझर इत्यादींचे वाटप केले.
यावेळी मंथन फाउंडेशन अध्यक्षा आशा भट्ट, संस्थेचे सूरज भट्ट, देविदास मोरे, तृतीयपंथी रेश्मा दाभाडे,  कुमाऊँ मित्र मंडळाचे कार्यकर्ते योगेश कापडी,  देवेंद्र सिंग ढेक आदी उपस्थित होते. यासाठी हम सफर ट्रस्ट( HST, Mumbai) संदीप माने व दिनेश चोपडे यांचे सहकार्य लाभले. या उपक्रमाचे मंथन फाउंडेशन, हम सफर ट्रस्ट, रिलीफ फाउंडेशन व सर्व तृतीयपंथी यांनी संयोजन केले.
admin

Recent Posts

MahaBulletin — 05 Sep 2026

गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

1 hour ago

MahaBulletin — 03 Sep 2026

मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…

2 days ago

MahaBulletin — 01 Sep 2026

सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…

4 days ago

MahaBulletin — 31 Aug 2026

रविवार, ३० ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघातांची…

5 days ago

MahaBulletin — 29 Aug 2026

शुक्रवार, २८ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 5 बातम्या 📰 चाकणमध्ये…

1 week ago

MahaBulletin — 28 Aug 2026

बुधवार, २६ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ चाकण…

1 week ago

This website uses cookies.