उद्योग विश्व

तरुणांनी राजकारणात जाण्यापेक्षा उद्योग व्यवसायात आपले स्थान निर्माण करावे : आमदार दिलीपशेठ मोहिते पाटील ● चाकण एमआयडीसीत राष्ट्रवादी काँग्रेस जनसंपर्क कार्यालय व एस. के. LED इंडस्ट्रीजचा उदघाटन समारंभ उत्साहात संपन्न…

तरुणांनी राजकारणात जाण्यापेक्षा उद्योग व्यवसायात आपले स्थान निर्माण करावे : आमदार दिलीपशेठ मोहिते पाटील
● चाकण एमआयडीसीत राष्ट्रवादी काँग्रेस जनसंपर्क कार्यालय व एस. के. LED इंडस्ट्रीजचा उदघाटन समारंभ उत्साहात संपन्न…

महाबुलेटीन न्यूज । प्रतिनिधी 
चाकण एमआयडीसी : “तरुणांनी राजकारणात जाण्यापेक्षा उद्योग व्यवसायात आपले स्थान निर्माण करावे, ग्रामपंचायत निवडणुकीत लाखो रुपये खर्च करुन एकमेकांची जिरवण्यापेक्षा ते पैसे व्यवसायात कामी लावावे व मराठी माणसाने यशस्वी उद्योजक व्हावे,” असे प्रतिपादन आमदार दिलीपशेठ मोहिते पाटील यांनी सावरदरी येथे केले. येथील राष्ट्रवादी काँग्रेस संपर्क कार्यालय व एस.के. LED इंडस्ट्रीजचे उदघाटन आमदार दिलीपशेठ मोहिते पाटील यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी ते बोलत होते.

यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सभापती अरुण चांभारे, बाजार समितीचे सभापती विनायक घुमटकर, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष राजाराम लोखंडे, माजी सभापती रमेश राळे, माजी सभापती विलास कोतोरे, पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र गाढवे, उद्योजक बाबाजीशेठ शेटे, युवा नेते मयुर मोहिते, पंचायत समितीचे माजी सदस्य रोहिदास गडदे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष कैलास लिंभोरे, पश्चिम विभाग अध्यक्ष अमोल पानमंद, स्वामी येळवंडे, जिल्हा उपाध्यक्ष गणेश बोत्रे, सरपंच वसंत भसे, माजी उपसभापती कैलास गाळव, सरपंच व राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. युवा नेते रवींद्र गाढवे यांनी सूत्रसंचालन केले, तर उद्योजक बाबाजीशेठ शेटे यांनी आभार मानले.


००००

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 10 Jun 2026

सोमवार, ८ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 गुन्हेगारीवर…

10 hours ago

MahaBulletin — 08 Jun 2026

रविवार, ७ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 खेडमध्ये…

2 days ago

MahaBulletin — 17 May 2026

शनिवार, १६ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पिंपरी…

3 weeks ago

MahaBulletin — 13 May 2026

रविवार, १० मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 चाकण…

4 weeks ago

MahaBulletin — 10 May 2026

शनिवार, ९ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 वृद्धेचा…

1 month ago

MahaBulletin — 09 May 2026

शुक्रवार, ८ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 बिबट्याची…

1 month ago

This website uses cookies.