निवड/नियुक्ती

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या स्विकृत नगरसेवकपदी संतोष दाभाडे, समीर खांडगे बिनविरोध

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या स्विकृत नगरसेवकपदी संतोष दाभाडे, समीर खांडगे बिनविरोध

महाबुलेटीन न्यूज : मिलिंद अच्युत 
तळेगाव दाभाडे :तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या स्वीकृत नगरसेवकपदी संतोष दाभाडे पाटील आणि समीर खांडगे या दोन्ही उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे. नगरपरिषद सभागृहात गुरुवारी (दि.१८) दुपारी २ वाजता विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. नगराध्यक्षा चित्रा जगनाडे यांनी पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहिले. उपमुख्याधिकारी सुप्रिया शिंदे यांनी त्यांना सहाय्य केले. 

तळेगाव दाभाडे शहर भाजपाचे माजी अध्यक्ष संतोष हरिभाऊ दाभाडे पाटील यांनी भारतीय जनता पक्षाच्या वतीने तर त्रिदल संस्थेचे समीर हरिश्चंद्र खांडगे यांनी जनसेवा विकास समितीच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केले होते. सत्तारूढ भाजपाचे स्विकृत नगरसेवक सुरेश दाभाडे आणि जनसेवा विकास समितीचे स्विकृत नगरसेवक रवींद्र आवारे यांनी पदाचा राजीनामा दिल्याने ही निवडणूक घेण्यात आली.

निवडणुकीच्या रिंगणात दोन जागांसाठी एकेकच उमेदवारी अर्ज आल्याने नगराध्यक्षा चित्रा जगनाडे यांनी दोन्ही सदस्यांच्या बिनविरोध निवडीची घोषणा केली. निवड जाहीर होताच सर्व नगरसेवकांनी या बिनविरोध निवडीचे बाके वाजवून स्वागत केले. नगराध्यक्षा चित्रा जगनाडे, उपनगराध्यक्ष सुशील सैंदाणे, सत्यशीलराजे दाभाडे, जिल्हा भाजपाचे अध्यक्ष गणेश भेगडे, जनसेवा विकास समितीचे संस्थापक किशोर आवारे, सभागृह नेते अमोल शेटे, विरोधी पक्षनेते गणेश काकडे, जेष्ठ नगरसेवक गणेश खांडगे, संतोष भेगडे, माजी नगरसेवक सुरेश दाभाडे, भाजपचे शहराध्यक्ष रवींद्र माने, रजनी ठाकूर आदींची अभिनंदनपर भाषणे झाली.

यावेळी जनसेवा विकास समितीच्या गटनेत्या सुलोचना आवारे, माजी नगराध्यक्ष ॲड. रवींद्रनाथ दाभाडे, वृषालीराजे दाभाडे, इंदरमल ओसवाल यांच्यासह नगरसेवक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपल्या भाषणात संतोष दाभाडे आणि समीर खांडगे यांनी बिनविरोध निवडीबद्दल आभार मानले.

कधी मिळणार कायमस्वरूपी मुख्याधिकारी? नागरिकांचा सवाल :- निवड जाहीर होताच कार्यकर्त्यांनी पेढे वाटून आणि फटाक्यांची आतषबाजी करत आनंदोत्सव साजरा केला. दोन महिन्यांपासून नगरपरिषदेस कायमस्वरुपी मुख्याधिकारी नसल्याबददल अनेकांनी आपल्या भाषणात नाराजी व्यक्त केली. 

समीर खांडगे व संतोष (वस्ताद) दाभाडे यांच्या रूपाने नागरपरिषदेला वजनदार व जबाबदार नगरसेवक मिळाले आहेत. राजकीय पक्षाचे जोडे बाजूला ठेवुन नागरिकांचे प्रश्न नवनिर्वाचित नगरसेवकांनी सोडवावे. समीर खांडगे सारख्या जनतेशी एकरूप असणाऱ्या कार्यकर्त्याला न्याय देताना मनस्वी आंनद होत आहे
— किशोर आवारे
संस्थापक अध्यक्ष
जनसेवा विकास समिती
—–

किशोरभाऊ आवारे व गणेशभाऊ खांडगे यांनी दिलेला शब्द पाळला. जनसेवा विकास समितीत सर्व सामान्य करकर्त्याना न्याय मिळतो
— समीर खांडगे
स्वीकृत नगरसेवक
——

भारतीय जनता पक्षात सर्व कार्यकर्यांना समान न्याय मिळतो, निवडणुकीतील निसटत्या पराभवा नंतर स्वीकृत सदस्य निवडून आल्याने मनस्वी आनंद होत आहे
— संतोष हरिभाऊ दाभाडे
स्वीकृत नगरसेवक
—–

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 10 Jun 2026

सोमवार, ८ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 गुन्हेगारीवर…

14 hours ago

MahaBulletin — 08 Jun 2026

रविवार, ७ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 खेडमध्ये…

3 days ago

MahaBulletin — 17 May 2026

शनिवार, १६ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पिंपरी…

4 weeks ago

MahaBulletin — 13 May 2026

रविवार, १० मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 चाकण…

4 weeks ago

MahaBulletin — 10 May 2026

शनिवार, ९ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 वृद्धेचा…

1 month ago

MahaBulletin — 09 May 2026

शुक्रवार, ८ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 बिबट्याची…

1 month ago

This website uses cookies.