पुणे जिल्हा

तळेगाव-चाकण-शिक्रापूर राष्ट्रीय महामार्गाचे काम मार्गी लावणार : खासदार डॉ. अमोल कोल्हे

 

महाबुलेटीन न्यूज नेटवर्क
पुणे : तळेगाव शहराला बायपास करणाऱ्या तळेगाव-चाकण-शिक्रापूर राष्ट्रीय महामार्गाच्या सुधारीत अलाईन्मेटची आखणीबाबत येथल्या संसद अधिवेशन काळात केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांची भेट घेणार असल्याचे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सांगितले.

गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या तळेगाव-चाकण-शिक्रापूर या राष्ट्रीय महामार्गाचा डीपीआर बनविण्याचे काम सध्या सुरू आहे. मात्र तळेगाव शहरात भूसंपादनात अडचणी येत आहेत. त्यामुळे तळेगाव शहराला बायपास करणाऱ्या रस्त्याचा पर्याय पडताळून पाहण्यासाठी खासदार डॉ. कोल्हे यांनी सर्व संबंधितांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीला मावळचे आमदार सुनील अण्णा शेळके, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक श्री. सुहास चिटणीस, एमआयडीसीचे अधीक्षक अभियंता प्रकाश चव्हाण, कार्यकारी अभियंता अतुल ढोरे, श्री. कोतवाल व डीपीआर तयार करणाऱ्या कन्सल्टन्ट लायन इंजिनिअरिंगचे अधिकारी आदी उपस्थित होते.

या बैठकीत तळेगाव शहराला बायपास करणाऱ्या पर्यायी रस्त्यांबाबत चर्चा झाली. त्यानुसार पीएमआरडीएच्या रिंगरोडच्या मार्गाने खेड तालुका हद्दीला जोडण्याच्या पर्यायाचा विचार करून नवीन अलाईन्मेट तयार करण्याच्या सूचना खासदार डॉ. कोल्हे व आमदार शेळके यांनी दिल्या.

या संदर्भात पीएमआरडीएशी समन्वय साधून सर्व्हेक्षण करून दोन आठवड्यात नवीन अलाईन्मेट तयार करण्याचे काम पूर्ण करा. १४ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या काळात संसद अधिवेशन आहे. त्यावेळी आपण व आमदार शेळके या संदर्भात केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन या रस्त्याचे काम मार्गी लावू असे डॉ. कोल्हे यांनी सांगितले.

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 07 Sep 2026

रविवार, ६ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 कामगार…

2 days ago

MahaBulletin — 06 Sep 2026

शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

3 days ago

MahaBulletin — 05 Sep 2026

गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

4 days ago

MahaBulletin — 03 Sep 2026

मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…

6 days ago

MahaBulletin — 01 Sep 2026

सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…

1 week ago

MahaBulletin — 31 Aug 2026

रविवार, ३० ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघातांची…

1 week ago

This website uses cookies.