महाबुलेटीन न्यूज नेटवर्क
चाकण : “सुरेशभाऊंनी आपले उभे आयुष्य तालुक्याच्या जनतेसाठी घालविले, म्हणून खेड पंचायत समितीच्या इमारतीला व आंबेठाण रोड सह आंबेठाण चौकालाही सुरेश भाऊंचे नाव द्यावे, त्यासाठी तसे ठराव करावेत”, असे निर्देश शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी चाकण नगरपरिषद व पंचायत समिती पदाधिकाऱ्यांना दिले आहेत.
खेड तालुका शिवसेना पक्षाची आढावा बैठक चाकण येथील ऐश्वर्या आयकॉन हॉल मध्ये संपन्न झाली, यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, ” सुरेशभाऊंचे विचार घेऊन जो तालुक्यात काम करील, तोच खरा भाऊंचा पुढील राजकीय वारसदार असेन. चाकण नगरपरिषद, तालुक्यातील सर्व ग्रामपंचायती व २०२४ ला पुन्हा खेड तालुक्यावर भगवा फडकवला, तरच भाऊंच्या आत्म्याला शांती मिळेल”, असे प्रतिपादन त्यांनी भाऊंना श्रद्धांजली वाहताना केले.
यावेळी त्यांनी भाऊंवर २० दिवस उपचार चालू असताना डॉक्टरांनी अथक प्रयत्न करूनही भाऊंना अखेरचा श्वास घेतला, त्यांचे विचार खऱ्या अर्थाने तालुक्यात घेऊन जायचे आहे. मात्र आपल्या पक्षाचे खंडीभर मंत्री असूनही भाऊंच्या घरी आले नाहीत व राष्ट्रवादीचे मंत्री भाऊंच्या घरी येऊन गेले, याबाबत स्पस्ट खंत व्यक्त केली. येत्या शनिवारी शिवसेना नेते संजय राऊत भाऊंच्या घरी येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी शिवसेना पुणे जिल्हा सहसंपर्क प्रमुख इरफान सय्यद, जिल्हा प्रमुख माऊली आबा कटके, जिल्हा परिषद सदस्य बाबाजी काळे, जि. प. सदस्या रुपालीताई कड, माजी जि. प. सदस्य किरणशेठ मांजरे, लोकनेते अशोकराव खांडेभराड, महिला आघाडी नेत्या विजयाताई शिंदे, महिला तालुका प्रमुख नंदाताई कड, खेड तालुका प्रमुख रामदास धनवटे, उपतालुका प्रमुख विष्णुदास उर्फ बापूसाहेब थिटे, युवा नेते राहुलशेठ गोरे, खेड पंचायत समितीचे सभापती भगवान पोखरकर, माजी सभापती अंकुश राक्षे, उपसभापती ज्योतीताई अरगडे, पं. स.सदस्य अमर कांबळे, पं. स.सदस्य मच्छिन्द्र गावडे, युवा नेते विजय शिंदे, युवा सेनेचे तालुका प्रमुख विशाल पोतले, सुरेशभाऊ भोर, माजी तालुका प्रमुख प्रकाश वाडेकर, चाकण नगराध्यक्षा स्नेहाताई जगताप, माजी नगराध्यक्ष शेखर घोगरे, माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र गोरे, ऋषिकेश झगडे, जिल्हा नेते लक्ष्मण जाधव, माजी शहर प्रमुख पांडुरंग गोरे, स्वप्नील बिरदवडे, मंगेश पऱ्हाड, किरण गवारी, साहेबराव कड, कविता करपे, शारदाताई कोरगावकर, विजयाताई जाधव, प्रकाश गोरे, तालुका सहसल्लागार विश्वास नेहेरे, उर्मिलाताई सांडभोर, गणेश मांडेकर, गोरख बच्चे, मच्छिन्द्र सातव, नगरसेवक महेश शेवकरी, बिपीन रासकर, माऊली कड, विकास काळे,
यावेळी जिल्हाप्रमुख माऊली कटके म्हणाले, “सुरेश भाऊंच्या शिवाय होणारी ही पक्षाची पहिली आढावा बैठक आहे. मला शिवसेना जिल्हा प्रमुख करण्यामध्ये भाऊंचा मोठा वाटा आहे. भाऊंचे सोज्वळ व्यक्तिमत्व आम्हाला प्रभावित करीत असे. अयोध्येच्या दौऱ्यात त्यांच्याशी फार जवळीक आली. भाऊंच्या अचानक जाण्याने पक्षाचे मोठे नुकसान झाले असून मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आम्हाला म्हणाले की, ज्या-ज्या ठिकाणी आमदार व खासदार नाहीत, त्याठिकाणी मी आहे, तुमची कामं घेऊन या, असे आश्वासन दिले आहे. शिवसेना पक्ष गोरे परिवार व तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या पाठीमागे उभा आहे, भाऊंच्या घरात पक्षाची जबाबदारी द्यायची आहे, येणाऱ्या निवडणुकांमध्ये सर्वांनी एकत्र येऊन जोमाने काम करायचे आहे व पक्षाचा वसा पुढे चालवायचा आहे.”
यावेळी अनेक पदाधिकाऱ्यांनी मनोगत व्यक्त करून भाऊंना श्रद्धांजली वाहिली. कामगार नेते गणेश पऱ्हाड यांनी सूत्रसंचालन केले, तर तालुका प्रमुख नंदाताई कड यांनी आभार मानले.
—–
रविवार, ६ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 कामगार…
शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…
सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…
रविवार, ३० ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघातांची…
This website uses cookies.