उद्योग विश्व

सुरक्षा रक्षकाच्या तत्परतेने 6 दरोडेखोरांना अटक

सुरक्षा रक्षकाच्या तत्परतेने 6 दरोडेखोरांना अटक

महाबुलेटीन न्यूज 
चाकण : कंपनीच्या सुरक्षारक्षकाला चाकूचा धाक दाखवून अल्युमिनियम उत्पादनासाठी लागणारे सुटे पार्ट चोरून नेल्याची घटना रात्री साडेदहाच्या सुमारास चाकण औद्योगिक क्षेत्रातील सावरदरी ( ता.खेड ) येथील तौरॉल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत घडली असून या प्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली असल्याची माहिती पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनीच्या भिंतीच्या आतील बाजूस ॲल्युमिनियमचे स्पेअर पार्ट काही अनोळखी व्यक्ती घेऊन जात असल्याचे कंपनीमध्ये पहारा देणाऱ्या सेक्युरिटी गार्डच्या लक्षात आले. त्या व्यक्तींना हटकले असता त्यांच्याकडं सेक्युरिटी गार्डला चाकू व हत्यारांनी धाक दाखवत हाताने मारहाण करून पकडून ठेवल्याचे कंपनीच्या दुसऱ्या सेक्युरिटी गार्डने पाहिले. समयसूचकता दाखवून माळुंगे पोलीस चौकी येथे संपर्क साधून घटनेची माहिती सेक्युरिटी गार्डने पोलिसांना दिली. दिलेल्या माहितीनंतर महाळुंगे पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक विलास गोसावी यांनी दोन पथके तयार करून सापळा रचून चोरांना अटक केली..

ईश्वर ओमकार राठोड, लखन सुरेश अवचीते, निपुर नारायण दास, ईश्वर राठोड, लखन सुरेश व शिशुपाल जगदीश प्रसाद अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तसेच फरारी झालेल्या आणखी दोन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेमध्ये भंगार व्यवसायिकाचाही हात असून आरोपींनी सांगितल्या प्रमाणे भंगार व्यावसायिक रशीद शेख यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून महाळुंगे पोलिसांनी सहा आरोपी व चोरलेला मुद्देमाल जप्त केला आहे. तर दोन आरोपी आणि एक भंगार व्यावसायिक फरारी असून त्यांचा शोध पोलीस घेत आहेत.

सदरची कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त परिमंडल 1 मंचक इप्पर, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे, महाळुंगे पोलीस चौकीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार, पोलीस निरीक्षक (गुन्हे) दशरथ वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुरेश यमगर, दत्तात्रेय गुळीग, पोलीस उपनिरीक्षक विलास गोसावी, प्रदीप गायकवाड, पोलीस अंमलदार अमोल बोराटे, पवन वाजे, भास्कर नागरे यांनी केली असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) दशरथ वाघमोडे हे करीत आहेत. 
०००००

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 07 Sep 2026

रविवार, ६ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 कामगार…

2 days ago

MahaBulletin — 06 Sep 2026

शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

3 days ago

MahaBulletin — 05 Sep 2026

गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

4 days ago

MahaBulletin — 03 Sep 2026

मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…

6 days ago

MahaBulletin — 01 Sep 2026

सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…

1 week ago

MahaBulletin — 31 Aug 2026

रविवार, ३० ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघातांची…

1 week ago

This website uses cookies.