महाबुलेटीन न्यूज नेटवर्क
मुंबई : नव्या दमाचा गायक आणि संगीतकार समर्थक शिंदेनं ‘करवली’ या धमाल गाण्याद्वारे संगीत क्षेत्रात पदार्पण केलं आहे. समर्थकनं या गाण्याचं संगीत आणि गायन अशी दुहेरी जबाबदारी निभावली आहे. “या नवरीची करवली लय गोरी गोरी….” असे धमाल शब्द असलेलं गीतकार हरिदास कड यांचं हे गाणं आता नक्कीच लग्नांमध्ये वाजणार यात शंका नाही.
साईनाथ राजाध्यक्ष यांनी निर्मिती केलेलं “करवली” हे गाणं सप्तसूर म्युझिक या यूट्यूब चॅनेलवर लाँच करण्यात आलं आहे. सप्तसूर म्युझिक या म्युझिक चॅनेलने गेल्या पाच महिन्यांत सहा गाणी लाँच केली असून, चॅनेलला जवळपास ७ हजार सबस्क्रायबर्स आहेत. “करवली” गाण्यात उर्मिला जगताप, हृषिकेश झगडे, अभिषेक घाग, सुनील जाधव, गणेश खाडे असे कलाकार आहेत. सुप्रसिद्ध संतोष भांगरे यांनी कोरिओग्राफी केली आहे. तर सुप्रसिद्ध गीतकार हरिदास कड यांनी हे गाणं लिहिलं आहे.
मराठी गाण्यांमध्ये खास लग्नाची अशी काही वेगळी गाणी आहेत. त्यात आता “करवली” या गाण्याचीही भर पडणार आहे. फास्ट बिट्स आणि धमाल शब्द असलेलं हे गाणं आता लग्न सोहळ्यांतील हळद, संगीत कार्यक्रमांमध्ये नक्कीच वाजणार आहे.
शुक्रवार, २४ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
गुरुवार, २३ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 आरटीई…
मंगळवार, २१ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🌾 निवृत्त…
सोमवार, २० एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 सिद्धेश्वर…
रविवार, १९ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 खेडमध्ये…
शनिवार, १८ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🏛️ आमदार…
This website uses cookies.