श्री सिद्धेश्वर मंदिर देवस्थानचे विश्वस्त श्रीकांत स्वामी यांचे निधन

महाबुलेटीन नेटवर्क / प्रतिनिधी
इंदापूर : सामाजिक कार्यकर्ते, श्री सिद्धेश्वर मंदिर देवस्थानचे ट्रस्टी श्रीकांत स्वामी यांचे उपचारादरम्यान बुधवारी पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात निधन झाले. ते सत्तावन्न वर्षांचे होते.
स्वामी यांना रक्तदाबाचा आजार होता. त्यातच न्युमोनिया झाल्याने दि.१२ जून रोजी उपचारासाठी त्यांना पुण्यातील सह्याद्री हाॅस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तेथे घेतलेल्या चाचणीत त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळले. पंचवीसहून अधिक दिवस उपचार घेतल्यानंतर ते कोरोनामुक्त झाले. त्यानंतर सहा जुलै रोजी त्यांना इंदापूरला आणण्यात आले होते. परंतू रक्तदाब व न्युमोनियाचा आजार बळावला. मूत्रपिंडाचा ही त्रास वाढला. त्यामुळे त्यांना उपचारासाठी पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान शरीरातील अवयव निकामी झाल्याने काल पहाटे त्यांचे निधन झाले.
गेल्या तीस पस्तीसहून अधिक वर्षांपासून ते सामाजिक क्षेत्रात कार्यरत होते. त्यांचा जनसंपर्क चांगला होता. पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप गारटकर, माजी नगराध्यक्ष दिवंगत धनंजय वाशिंबेकर यांचे ते अत्यंत विश्वासू सहकारी होते. मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाची संकल्पना रुजवण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता.
admin

Recent Posts

MahaBulletin — 11 Jun 2026

बुधवार, १० जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 दारूकांडानंतर…

1 hour ago

MahaBulletin — 10 Jun 2026

सोमवार, ८ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 गुन्हेगारीवर…

1 day ago

MahaBulletin — 08 Jun 2026

रविवार, ७ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 खेडमध्ये…

3 days ago

MahaBulletin — 17 May 2026

शनिवार, १६ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पिंपरी…

4 weeks ago

MahaBulletin — 13 May 2026

रविवार, १० मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 चाकण…

4 weeks ago

MahaBulletin — 10 May 2026

शनिवार, ९ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 वृद्धेचा…

1 month ago

This website uses cookies.