सण-उत्सव

श्री. एस. पी. देशमुख शिक्षण संस्थेत गणरायाचे आगमन

 

श्री. एस. पी. देशमुख शिक्षण संस्थेच्या विद्यानिकेतन व विद्याव्हॅली शाळेने शाळा बंद असतानाही शाळेत बाप्पाची आरास व प्राणप्रतिष्ठा करीत पंरपरा अखंडित ठेवली

महाबुलेटीन न्यूज / प्रतिनिधी
चाकण : नगरीतील श्री. एस. पी. देशमुख शिक्षण संस्थेच्या विद्यानिकेतन इंग्लिश मिडीयम स्कूल, चाकण या प्रशालेत पंरपरेनुसार बाप्पाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.

संस्थेच्या विद्यानिकेतन व विद्याव्हँली इंटरनँशनल स्कुल नेहमी सांस्कृतिक, सामाजिक व कला अशा अनेक ठिकाणी सक्रिय सहभाग घेत असते. कोविड १९ या महामारीतही शाळा बंद असतानाही श्री. एस. पी. देशमुख शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. शामरावजी देशमुख यांनी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा करून शाळेतील बाप्पाची पंरपरा अखंडित ठेवली.

विद्यार्थ्यांना शाळेत ही आपल्या भारतीय संस्कृतीची माहिती व्हावी व त्यातून नैतिकतेचे संस्कार व राष्ट्रीय मुल्ये रूजावीत, या निर्मळ भावनेने शाळेत गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठा केली जाते. तसे पाहिले तर गणपती बाप्पा बुद्धीची देवता म्हणून मानले जाते व सर्व साधारणपणे लहान मुलांसाठी गणपती उत्सव जणू काही आंनद पर्व.

गणपतीच्या आगमना बरोबरच अध्यक्षांच्या शुभहस्ते गणपती बाप्पाची विधीवत पुजा व आरती करण्यात आली. तसेच गणपती बाप्पाच्या चरणी कोवीडचे संकट दुर व्हावे ही प्रार्थना केली. सध्या सर्व शाळा व महाविद्यालय हे बंद आहेत, त्यामुळे शिक्षणांची गैरसोय पाहायला मिळत आहे.

परंतु लॉकडाऊनच्या काळात ऑनलाइन शिक्षण देण्याचा सर्वांचा प्रयत्न चालू आहे. अशा बिकट परिस्थितीत सर्वच क्षेत्रात वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे, तरी परिस्थिती कायमस्वरूपी संपावी व पुन्हा एकदा परिसरातीलच नव्हे तर जगावरील कोवीडचे संकट दुर होऊन सर्व शाळा, महाविद्यालये व इतर परिसराची भरभराट व्हावी, ही प्रार्थना बाप्पा चरणी केली. या समारंभास दिपक शिंदे सर, श्रीशैल हेंगोडे सर, विराज पाटील, शिवाजी राऊत सर आदी उपस्थित होते.


MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 07 Sep 2026

रविवार, ६ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 कामगार…

3 days ago

MahaBulletin — 06 Sep 2026

शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

4 days ago

MahaBulletin — 05 Sep 2026

गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

5 days ago

MahaBulletin — 03 Sep 2026

मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…

7 days ago

MahaBulletin — 01 Sep 2026

सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…

1 week ago

MahaBulletin — 31 Aug 2026

रविवार, ३० ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघातांची…

1 week ago

This website uses cookies.