महाबुलेटीन न्यूज
आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : आषाढी वारी सन २०२१ या वर्षातील श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुख पदी श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे विश्वस्त विधीतज्ञ ॲड. विकास ढगे पाटील यांची सर्वानुमते निवड करण्यात आली असल्याची माहिती व्यवस्थापक माउली वीर यांनी दिली.
माहे जून महिन्यातील विश्वस्त मंडळाची मासिक बैठक ऑनलाइन घेण्यात आली. या बैठकीस प्रमुख विश्वस्त डॉ. अभय टिळक, विश्वस्त लक्ष्मीकांत देशमुख, योगेश देसाई व विकास ढगे पाटील उपस्थित होते. सहा पैकी एक विश्वस्त अनुपस्थित तर एक जागा रिक्त आहे. विश्वस्त रिक्त जागेच्या दाखल प्रस्तावावर अद्याप अंतिम निर्णय प्रलंबित आहे.
या पूर्वी त्यांनी सन २०१८ चे पालखी सोहळ्यात प्रमुख म्हणून काम केले आहे. तसेच सन २०१८ ते २०२० सलग प्रमुख विश्वस्त म्हणून दोन वर्ष कामकाज केले आहे. ॲड. ढगे पाटील यांनी पुणे बार असोशिएशनचे अध्यक्ष म्हणून काम केलेले आहे. खेड तालुक्यातील श्री क्षेत्र भीमाशंकर देवस्थानचे ते उपाध्यक्ष देखील आहेत. या निवडीचे आळंदी पंचक्रोशीतून त्यांचे स्वागत करण्यात आले असून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
००००
सोमवार, ७ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 जिल्हा…
रविवार, ६ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 कामगार…
शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…
सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…
This website uses cookies.