निधन वार्ता

चाकण शिवसेना प्रथम शाखा प्रमुख, माजी जिल्हा उपप्रमुख व कट्टर शिवसैनिक सुरेशशेठ मांजरे यांचे निधन

 

महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी
चाकण : चाकण येथील शिवसेनेचे प्रथम शाखा प्रमुख, माजी जिल्हा उपप्रमुख व कट्टर शिवसैनिक सुरेशशेठ शंकरराव मांजरे ( वय ६० ) यांचे रविवारी ( दि. १३ सप्टेंबर ) दुःखद निधन झाले.

१९८० च्या दशकात मुंबई नंतर महाराष्ट्रातील शिवसेनेची पहिली शाखा चाकण येथे स्थापन करणारे ते शहरातील पहिले शिवसैनिक होते. तसेच उत्तर पुणे जिल्ह्यात शिवसेना प्रमुख मा. बाळासाहेब ठाकरे व तत्कालीन सेनेचे नेते छगन भुजबळ यांच्या सभांचे आयोजन त्यांनी केले होते. त्यावेळी चित्रपट अभिनेते व शिवसैनिक स्व. दादा कोंडके यांना निमंत्रित करून चाकण शहरातून त्यांची मिरवणूक काढली होती. या सर्व कार्यक्रमाचे नियोजन त्यांनी शिस्तबद्ध व मोठ्या थाटात केले होते. त्यामुळे ते शिवसेनेचे कट्टर शिवसैनिक म्हणून पुणे जिल्ह्याला परिचित होते.

त्यांच्यामागे पत्नी, एक मुलगा, मुलगी, भाऊ, पुतणे, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. उद्योजक अरुणशेठ मांजरे, माजी जिल्हा परिषद सदस्य व राजगुरूनगर बँकेचे संचालक किरणशेठ मांजरे, उद्योजक बाळासाहेब व मनोजशेठ मांजरे यांचे ते बंधू होत.

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 18 Jun 2026

बुधवार, १७ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ मोठे…

4 hours ago

MahaBulletin — 15 Jun 2026

रविवार, १४ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ भीमाशंकर…

3 days ago

MahaBulletin — 14 Jun 2026

शनिवार, १३ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पुण्यात…

4 days ago

MahaBulletin — 13 Jun 2026

शुक्रवार, १२ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 गायरान…

5 days ago

MahaBulletin — 12 Jun 2026

गुरुवार, ११ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 विषारी…

6 days ago

MahaBulletin — 11 Jun 2026

बुधवार, १० जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 दारूकांडानंतर…

1 week ago

This website uses cookies.