महाबुलेटीन न्यूज : शैलेश काटे
इंदापूर : शिक्षक दिनानिमित्त कोविड सर्वेक्षणामध्ये सहभागी झालेल्या १०४ शिक्षकांचा इंदापूर नगरपरिषदेच्या वतीने नगराध्यक्षा अंकिता मुकुंद शहा, मुख्याधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल, इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंद शहा यांच्या हस्ते मास्क, रुमाल व गुलाबाचे फुल देऊन सन्मान करण्यात आला. आज (दि.५ सप्टेंबर) भार्गव बगिच्यामध्ये हा कार्यक्रम झाला.
या वेळी बोलताना नगराध्यक्षा अंकिता शहा म्हणाल्या की, प्रत्येकाचे आयुष्य घडवण्यात शिक्षकांचे योगदान मोठे असते. वेगवेगळ्या प्रसंगी, व्यवहारात लोक शिक्षकांप्रमाणे मार्गदर्शक म्हणून कार्यरत असतात. कुटुंबाची काळजी घेऊन या कोरोना संकटावर मात करण्याचा आपला प्रयत्न असला पाहिजे. त्यासाठी सर्वेक्षणाच्या माध्यमातून शिक्षकांनी लोकांकरिता दिलेले योगदान अमूल्य आहे.
या वेळी डॉ. प्रदीप ठेंगल, प्रवीण धाईंजे, सुनील मोहिते, सुरेश सोनवणे यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी प्रशासकीय अधिकारी वर्षा क्षीरसागर उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अल्ताप पठाण यांनी केले. सूत्रसंचालन सुभाष ओव्हाळ यांनी केले. तर गायकवाड यांनी आभार मानले.
मंगळवार, २३ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 लोहगड…
रविवार, २१ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 5 बातम्या 📰 राजकीय…
शनिवार, २० जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 5 बातम्या 🛣️ पुणे-नाशिक…
शुक्रवार, १९ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पुणे-नाशिक…
गुरुवार, १८ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 खेडमध्ये…
बुधवार, १७ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ मोठे…
This website uses cookies.