गुन्हेगारी

शिक्रापुरात ४० जणांवर गुन्हा दाखल

शिक्रापुरात ४० जणांवर गुन्हा दाखल

महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी
शिक्रापूर : शिक्रापूर ( ता. शिरूर ) येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाची निवडणूक पार पडल्यानंतर ग्रामस्थांनी गावातील ग्रामदैवत भैरवनाथ मंदिरामध्ये पस्तीत ते चाळीस हून अधिक लोकांनी एकत्र येऊन नवनिर्वाचित उपसरपंच गिलबिले यांचा सत्कार केल्या प्रकरणी शिक्रापूर पोलिसांनी ४० जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

शिक्रापूर ( ता. शिरूर ) ग्रामपंचायतच्या चालू पाच वर्षांच्या काळामध्ये अनेकांना सरपंच, उपसरपंच पदाची संधी देण्यात आली. १७ ऑगस्ट रोजी शिक्रापूर ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदाची निवडणूक पार पडली. यावेळी सत्ताधारी गटाच्या रोहिणी दत्तात्रय गिलबिले यांची उपसरपंच पदी निवड झाली. निवड झाल्यानंतर अनेकांनी ग्रामपंचायत येथे गिलबिले यांचा सन्मान केला.

त्यानंतर शिक्रापूर गावचे ग्रामदैवत भैरवनाथ मंदिरामध्ये सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गावातील अनेक पदाधिकारी, पुढारी यांसह अनेकांनी तेथे गर्दी केली. शासनाचे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी घालून बंदी असताना देखील लोकांची गर्दी करून नवनिर्वाचित उपसरपंच रोहिणी गिलबिले यांचा सत्कार केला.

याबाबतचे फोटो सोशल मिडीयावर प्रसारित झाल्यानंतर शिक्रापूर पोलिस स्टेशनचे पोलीस नाईक तेजस लक्ष्मण रासकर यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने रेखा बांदल, शिक्रापूर ग्रामपंचायतीच्या सरपंच हेमलता राऊत, उपसरपंच रोहिणी गिलबिले, रामभाऊ सासवडे, रेखा बांदल, जयश्री भुजबळ, जयश्री दोरगे, भगवान वाबळे, दत्तात्रय गिलबिले, राजाभाऊ मांढरे, दत्तात्रय राऊत, जनार्दन दोरगे, दिलीप वाबळे, अण्णा हजारे, नाना गिलबिले, आकाश गिलबिले व इतर जणांवर गुन्हा दाखल केला असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जयप्रकाश चव्हाण हे करीत आहेत.

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 15 Jun 2026

रविवार, १४ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ भीमाशंकर…

2 days ago

MahaBulletin — 14 Jun 2026

शनिवार, १३ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पुण्यात…

3 days ago

MahaBulletin — 13 Jun 2026

शुक्रवार, १२ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 गायरान…

4 days ago

MahaBulletin — 12 Jun 2026

गुरुवार, ११ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 विषारी…

5 days ago

MahaBulletin — 11 Jun 2026

बुधवार, १० जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 दारूकांडानंतर…

6 days ago

MahaBulletin — 10 Jun 2026

सोमवार, ८ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 गुन्हेगारीवर…

1 week ago

This website uses cookies.