राष्ट्रीय

शिक्रापूर-चाकण-तळेगाव रस्ता होणार आठ पदरी, ● शिक्रापूर-चाकण-तळेगाव संपूर्ण लांबी मध्ये उड्डाणपूल करण्यासाठी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी दाखविला ग्रीन सिग्नल

शिक्रापूर-चाकण-तळेगाव रस्ता होणार आठ पदरी,
● शिक्रापूर-चाकण-तळेगाव संपूर्ण लांबी मध्ये उड्डाणपूल करण्यासाठी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी दाखविला ग्रीन सिग्नल

महाबुलेटीन न्यूज । हनुमंत देवकर 
चाकण ( पुणे ) : शिक्रापूर-चाकण-तळेगाव संपूर्ण लांबी मध्ये उड्डाणपूल करण्यासाठी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी ग्रीन सिग्नल दाखविला आहे. शिक्रापूर-चाकण-तळेगाव रस्ता आठ पदरी होणार आहे. या संपूर्ण लांबी मध्ये 57 किलोमीटरच्या परिसरामध्ये एलेव्हेटेड ब्रिज संपूर्ण उड्डाणपूल करण्यासाठी नितीन गडकरी यांनी नवीन डीपी आर बनवण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. 

यापूर्वी या रस्त्याला 1078 कोटी रुपये मंजूर करून याचे चार पदरी करण्याचे काम करण्याचे ठरले होते. परंतु चाकण ते तळेगाव या परिसरातील मोठ्या प्रमाणावर ची वाहनांची संख्या लक्षात घेता. व यापूर्वी 24 तारखेला पुण्याच्या भूमिपूजनाच्या कामाच्या दरम्यान दैनिक लोकमत मधून या प्रकारची मागणी करण्यात आली होती व तसे निवेदन व ती बातमी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांना पुणे-नाशिक महामार्गचे समन्वयक इंजि. दिलीप मेदगे व खासदार गिरीश बापट यांनी चर्चा करून याबाबत बदल करण्याच्या बाबतीत चर्चा केली होती. याला प्रतिसाद देत व स्थानिक लोकांच्या आग्रहाचा व समस्येचा सकारात्मक पद्धतीने विचार करून नितीन गडकरींनी काल मुंबई येथे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, बांधकाम मंत्री यांच्यासोबत झालेल्या बैठकी दरम्यान याही रस्त्याला पुढील पंचवीस वर्षांचे नियोजन लक्षात घेता. याबाबतचे नवीन डीपीआर बनवण्याचे आदेश शासकीय अधिकाऱ्यांना दिले. त्यामुळे या प्रकल्पाची किंमत वाढणार असून रस्त्याच्या चार लेन यावरून जात असल्यामुळे फार मोठे जमीन संपादन करण्याचा विषय येणार नाही. मधल्या पिलर साठी दोन मीटरची आवश्यक जागा ही फक्त वाढणार असून 20 ते 22 मीटर रुंदी मधून हा संपूर्ण रस्ता तयार होऊ शकतो. अशी माहिती श्री दिलीप मेदगे यांनी दिली.

खालुम्ब्रे, म्हाळुंगे, खराबवाडी या ठिकाणाहून प्रचंड वाहतूक कोंडी या प्रकल्पाबाबत प्रकल्पामुळे कायमची सुटेल व मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांना खाली न उतरता थेट प्रवास करता येईल. त्यामुळे चाकण ते तळेगाव हे अंतर विस मिनिटांमध्ये पार करता येणे शक्य होणार आहे. एचपी चौकामध्ये चौकातील उंचीमुळे अंडरपास करण्याची व्यवस्था व नवीन पुलांच्या बाबतीतही बरेच मोठे बदल होण्याची शक्यता या नवीन डीपी आर मध्ये होणार आहे. संपूर्ण 53 किलोमीटरमध्ये सलग उड्डाणपूल झाल्यामुळे हे अंतर 40 ते 45 मिनिटांमध्ये विना थांबा पार करता येईल. शिक्रापूर ते तळेगाव मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांना व वाहतूकदारांना याचा खूप फायदा होणार आहे.
००००

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 10 Jun 2026

सोमवार, ८ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 गुन्हेगारीवर…

18 hours ago

MahaBulletin — 08 Jun 2026

रविवार, ७ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 खेडमध्ये…

3 days ago

MahaBulletin — 17 May 2026

शनिवार, १६ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पिंपरी…

4 weeks ago

MahaBulletin — 13 May 2026

रविवार, १० मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 चाकण…

4 weeks ago

MahaBulletin — 10 May 2026

शनिवार, ९ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 वृद्धेचा…

1 month ago

MahaBulletin — 09 May 2026

शुक्रवार, ८ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 बिबट्याची…

1 month ago

This website uses cookies.