महाबुलेटीन न्यूज नेटवर्क
पुणे : शासनाने दस्त नोंदणीमध्ये मुद्रांक शुल्कात विशेष सवलत दिली असल्यामुळे जिल्ह्यातील दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणीचे कामकाज वाढलेले आहे. मुद्रांक शुल्क सवलतीचा सर्वसामान्य जनतेला लाभ घेता यावा यासाठी जिल्ह्यातील दुय्यम निबंधक कार्यालये दि. 19, 25 व 26 डिसेंबर डिसेंबर या शासकीय सुट्टीच्या दिवशी सुरू ठेवण्यात येणार आहेत. नागरिकांनी शासनाने दिलेल्या विशेष सवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सह जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी दिलीप पाटील यांनी केले आहे.
सहदुय्यम निबंधक बारामती, सह दुय्यम निबंधक बारामती क्र.-2, दुय्यम निबंधक आंबेगाव, दुय्यम निबंधक भोर, दुय्यम निबंधक दौंड, दुय्यम निबंधक इंदापूर, दुय्यम निबंधक नारायणगांव दुय्यम निबंधक केडगांव, दुय्यम निबंधक खेड, दुय्यम निबंधक खेड क्र.2, दुय्यम निबंधक खेड क्र.3, दुय्यम निबंधक लोणावळा, दुय्यम निबंधक मावळ, दुय्यम निबंधक मावळ क्र.2 दुय्यम निबंधक मुळशी, दुय्यम निबंधक मुळशी क्र.2, दुय्यम निबंधक जुन्नर, दुय्यम निबंधक पुरंदर, दुय्यम निबंधक शिरुर, दुय्यम निबंधक तळेगांव ढमढेरे, दुय्यम निबंधक वेल्हा ही कार्यालये सुरू राहणार असून जिल्ह्यातील नागरिकांनी शासनाने दिलेल्या विशेष सवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. पाटील यांनी केले आहे.
0000
सोमवार, ८ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 गुन्हेगारीवर…
रविवार, ७ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 खेडमध्ये…
शनिवार, १६ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पिंपरी…
रविवार, १० मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 चाकण…
शनिवार, ९ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 वृद्धेचा…
शुक्रवार, ८ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 बिबट्याची…
This website uses cookies.