आरक्षण

महाबुलेटीन ब्रेकिंग न्यूज : सरपंच पदांचे आरक्षण अखेर रद्दच… पुणे जिल्ह्यासह खेड तालुक्यातील ही आरक्षण रद्द… निवडणुकीनंतर ३० दिवसांच्या आत सरपंच व उपसरपंच निवडावेत, ग्रामविकास विभागाने काढला आज आदेश…

 

महाबुलेटीन न्यूज : हनुमंत देवकर
पुणे : राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये यापूर्वी सरपंच पदांचे आरक्षण काढण्यात आले होते, तसेच आठ डिसेंबर रोजी खेड तालुक्यात आरक्षण काढण्यात आले होते, हे सर्व आरक्षण रद्द करण्यात आले असून हे सर्व आरक्षण १५ जानेवारीच्या निवडणुकीनंतर होणार आहे. तसेच निवडणुकीनंतर ३० दिवसांच्या आत सरपंच व उपसरपंच निवडावेत, असा आदेश महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने आज ( दि. १६ डिसेंबर ) रोजी पत्र क्रमांक ग्रापंनि २०२०/ प्र. क्र.६६/ पंरा-२ द्वारे काढला आहे.

महाराष्ट्र ग्रामपंचायत ( सरपंच व उपसरपंच ) नियम, १९६४ च्या अनुषंगाने दि. ५ मार्च २०२० रोजी राज्यस्तरीय सरपंच आरक्षण राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. त्या अनुषंगाने राज्यातील काही जिल्ह्यात निवडणूक पूर्व सरपंच आरक्षण सोडत कार्यक्रम आयोजित करण्यात आला व उर्वरित जिल्ह्यातील सरपंच आरक्षण सोडत कार्यक्रमाबाबत ग्रामविकास विभागाचे दिनांक ११ डिसेंबर २०२० चे पत्रान्वये निवडणूक कार्यक्रमानंतर आयोजित करण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत.

देशातील तसेच राज्यातील कोविड-१९ महामारीच्या पार्श्वभूमीवर मार्च २०२० ते डिसेंबर २०२० या कालावधीत ज्या ग्रामपंचायतींची मुदत संपलेली आहे, अशा ग्रामपंचायतींवर महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ मधील दि. २९ सप्टेंबर २०२० रोजीच्या सुधारणे अन्वये प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे.

राज्य निवडणूक आयोग यांच्या दि. ११ डिसेंबर २०२० च्या पत्रान्वये राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायतींचा सार्वत्रिक निवडणुकींचा कार्यक्रम घोषित केला आहे. त्यामुळे सध्यस्थीतीत निवडणुकीची आचारसंहिता लागू झालेली आहे. तथापि राज्य निवडणूक आयोगाकडून निवडणुकीची उद्घोषणा होण्यापूर्वी काही जिल्ह्यांमध्ये सरपंच पदाची आरक्षण सोडत काढल्या होत्या व अद्यापही बहुतांशी जिल्ह्यांमध्ये आरक्षण सोडत कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला नाही.

सरपंच पदांचे आरक्षणानंतर, संबंधित जातीच्या दाखल्यांची पडताळणी वेळेत न होणे, जातीचा दाखला अमान्य होणे तसेच बनावट प्रमाणपत्र सादर करणे इत्यादी कारणांमुळे निवडणूक रद्द करून पुनश्च नव्याने निवडणूक घेणे क्रमप्राप्त ठरते. या पार्श्वभूमीवर वरील बाबींचा सारासार विचार करून सरपंच आरक्षण सोडतीबाबत एकसमान धोरण असणे व होणाऱ्या गैरप्रकारांना पायबंद बसण्याकरिता तसेच योग्य व्यक्तीस न्याय मिळण्याच्या अनुषंगाने शासनाने ज्या जिल्ह्यांमध्ये सरपंच पदाची आरक्षण सोडत कार्यक्रम यापूर्वी राबविण्यात आला आहे, ती सदर प्रक्रिया रद्द करून नव्याने घेण्याबाबत निर्णय घेतला आहे. आयोगाच्या निवडणूक कार्यक्रमानुसार निवडणूक मतदान कार्यक्रम दि. १५/०१/२०२० रोजी होणार असून निवडणूक निकालाची अधिसूचना दि. २१/०१/२०२० रोजी प्रसिद्ध होणार आहे. त्यामुळे सरपंच आरक्षण सोडत कार्यक्रम तसेच सरपंच व उपसरपंच यांची निवडणूक मतदानानंतर लवकरात लवकर तथापि ३० दिवसांच्या आत राबविण्यात यावा, असा आदेश महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभागाचे कक्ष अधिकारी विवेक शिंदे यांनी बुधवार, दि. १६ डिसेंबर २९२० काढला आहे.

■ वाचा ग्रामविकास विभागाचा पुढील आदेश…

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 10 Jun 2026

सोमवार, ८ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 गुन्हेगारीवर…

12 hours ago

MahaBulletin — 08 Jun 2026

रविवार, ७ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 खेडमध्ये…

2 days ago

MahaBulletin — 17 May 2026

शनिवार, १६ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पिंपरी…

3 weeks ago

MahaBulletin — 13 May 2026

रविवार, १० मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 चाकण…

4 weeks ago

MahaBulletin — 10 May 2026

शनिवार, ९ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 वृद्धेचा…

1 month ago

MahaBulletin — 09 May 2026

शुक्रवार, ८ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 बिबट्याची…

1 month ago

This website uses cookies.