अध्यात्मिक

महाबुलेटीन ब्रेकिंग न्यूज : आळंदीच्या नागराध्यक्षांसह संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींच्या आषाढीवारी सोहळ्यात सहभागी होणा-या २२ वारक-यांना कोरोनाची लागण

महाबुलेटीन ब्रेकिंग न्यूज : आळंदीच्या नागराध्यक्षांसह संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींच्या आषाढीवारी सोहळ्यात सहभागी होणा-या २२ वारक-यांना कोरोनाची लागण

महाबुलेटीन न्यूज । अर्जुन मेदनकर
आळंदी, २ जुलै : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचे पालखीचे आळंदी मंदिरातून शुक्रवारी (दि.२ जुलै) रोजी मोजक्याच भाविकांचे उपस्थितीत प्रस्थान होणार असल्याने आळंदीत राज्यभरातून आलेल्या २०४ वारकऱ्यांची काल आरटीपीसीआर चाचणी घेण्यात आली. त्यामध्ये आळंदीच्या नागराध्यक्षांसह तब्बल २२ वारकऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आळंदीत एकच खळबळ उडाली आहे. कोरोना चाचणी तापसणीपूर्वी हे वारकरी ज्यांच्या संपर्कात आले असतील त्यांनी त्वरित आरटीपीसीआर चाचणी करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

आळंदी देवस्थान व आळंदी ग्रामीण रुग्णालय यांचे माध्यमातून राज्यभरातून आलेल्या निमंत्रित वारकरी, मानकरी, टाळकरी, गावकरी यांची कोविड १९ ची तपासणी करण्यात आली होती. राज्यातून आळंदीत आलेल्या वारकऱ्यांना कोरोना चाचणी केल्यानंतर फ्रुटसवाले धर्मशाळेत क्वारंटाईन करण्यात आले होते. पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या वारकऱ्यांना म्हाळुंगे कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून समजते.

आळंदी पालखी सोहळ्यावर कोविड १९ चे सावट असून मागील वर्षी प्रमाणे मोजक्याच वारकरी भाविकांत संत ज्ञानेश्वर महाराज पादुका पालखी सोहळ्याचे शुक्रवारी ( दि. २ जुलै ) रोजी प्रस्थान होणार आहे. यासाठी आळंदी देवस्थान, आळंदी पोलिस, खेड महसूल, विद्युत विभाग, आळंदी नगरपरिषद, आळंदी ग्रामीण रुग्णालय आरोग्य सेवा प्रशासन कोविड १९ चे मार्गदर्शक सूचनांचे पालन करीत तयारी करीत आहे.
००००

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 10 Sep 2026

सोमवार, ७ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 जिल्हा…

5 hours ago

MahaBulletin — 07 Sep 2026

रविवार, ६ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 कामगार…

3 days ago

MahaBulletin — 06 Sep 2026

शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

4 days ago

MahaBulletin — 05 Sep 2026

गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

5 days ago

MahaBulletin — 03 Sep 2026

मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…

1 week ago

MahaBulletin — 01 Sep 2026

सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…

1 week ago

This website uses cookies.