महाबुलेटीन न्यूज । प्रतिनिधी
राजगुरूनगर : राजगुरुनगर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयातील सरकारी वकील देवेंद्र मधुकर सोन्निस (वय ५७ रा. पुणे) यांना साडेतीन हजार रुपयांची लाच स्वीकारताना पुणे लाचलुचपत विभागाच्या पोलिसांनी रंगेहात पकडून अटक केली. या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
राजगुरूनगर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात २ महिन्यापासून सरकारी वकील म्हणून देवेंद्र मधुकर सोन्निस हे काम पाहत आहेत. दि.१४ जुलै रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास पुणे लाच लुचपत विभागाच्या पोलिसांनी त्यांना लाच स्वीकारताना अटक केली. यातील तक्रारदार यांच्या आशीलाचा जामीन अर्ज न्यायालयात सुनावणीसाठी आहे. सुनावणी होत असताना न्यायालयात हरकत घेऊ नये व जामीन मिळण्यासाठी मदत करण्यासाठी लोकसेवक देवेंद्र सोन्निस यांनी तक्रारदाराकडून पाच हजार रुपयांची मागणी केली होती.
पाच हजाराची लाच घेण्याचे ठरल्यानंतर तक्रारदाराने पुणे लाच लुचपत विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार आज राजगुरुनगर येथे लाचलुचपत विभागाच्या पोलिसांनी सापळा रचून तडजोडीअंती तक्रारदार यांच्याकडून साडेतीन हजार रुपये लाच स्वीकारताना एसीबीच्या पोलिसांनी त्यांना रंगेहात पकडले. या घटनेमुळे पुणे जिल्ह्यासह सर्वत्र खळबळ उडाली आहे. यासंदर्भात खेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोमवार, ७ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 जिल्हा…
रविवार, ६ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 कामगार…
शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…
सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…
This website uses cookies.