महाबुलेटीन न्यूज नेटवर्क
पुणे : रुपी बँकेच्या विलीनीकरनाबाबत पुण्याचे खासदार गिरीश बापट यांनी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांची दिल्ली येथे भेट घेऊन रिझर्व बँकेला तत्काळ विकिनिकरणाची शिफारस करण्याची विनंती केली. रुपी बँक ही १०८ वर्षाची जुनी बँक असून मागील चार वर्षे बँकेने समाधानकारक कामगिरी केलेली आहे. तसेच खर्चातही मोठ्या प्रमाणात काटकसर केली. बँकेच्या प्रगतीचा आलेख हा मागील चार वर्षात उंचावत आहे. बँकेच्या विलीनीकरणाचा प्रश्न गेले सात वर्षे रिझर्व्ह बँकेकडे प्रलंबित असून बँकेचे गुंतवणूक आणि ठेवीदार यांचा आता सहनशक्तीचा कळस झाला आहे. त्यामुळे त्यांचे कोणतेही नुकसान न होता तत्काळ निर्णय होणे अपेक्षित आहे, अशी रिझर्व्ह बँकेला शिफारस करण्याची विनंती खा. बापट यांनी केंद्रीय अर्थ राज्यमंत्र्यांना निवेदनाद्वारे केली आहे.
—
रविवार, २ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 💧 धरण…
शुक्रवार, ३१ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 आज…
गुरुवार, ३० जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 खेडमध्ये…
मंगळवार, २८ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 खेड…
रविवार, २६ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 नीट…
शनिवार, २५ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 💧 खेडमध्ये…
This website uses cookies.