रोटरी क्लबच्या उपप्रांतपालपदी नितीन पाटील

चाकण रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी दीपक करपे, तर सचिवपदी सुभाष शिंदे
नितीन पाटील
दिपक करपे

महाबुलेटीन नेटवर्क / प्रतिनिधी

चाकण : रोटरी क्लब ऑफ चाकणच्या सन 2020-21 या वर्षाकरिता रो. दिपक करपे यांची अध्यक्षपदी तर सचिव पदी रो. सुभाष शिंदे यांची निवड करण्यात आली आहे.
तसेच रो. नितिन पाटील यांची रोटरी जिल्हा 3131 उपप्रांतपाल पदी, तर रो. विनय भुजबळ यांची जिल्हा पब्लिक इमेज चेअरमन पदी व संदीप बागडे यांची जिल्हा फाउंडेशन झोनल कमिटी चेअरमन पदी निवड झाली आहे.
रोटरी क्लबचे हे 35 वे वर्ष असून सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य या सर्व क्षेत्रात क्लबने भरीव कार्य केले आहे. नूतन अध्यक्ष दिपक करपे यांनी यापूर्वी सन 2015-16 साली रोटरी क्लबचे सचिव पद भूषवले होते. दिपक करपे यांच्या अध्यक्षतेखाली सन 2020-21या वर्षाकरिता रोटरी क्लबच्या संचालक मंडळाची निवड झाली आहे. नूतन अध्यक्ष रो. दिपक करपे यांचा व त्यांच्या संचालक मंडळाचा विविध सामाजिक उपक्रम राबवण्याचा  मानस आहे. तसेच सध्याच्या कोवीड-19 च्या परिस्थितीवर उपक्रम करण्याचा क्लबचे पहिले उद्दिष्ट राहणार आहे.
admin

Recent Posts

MahaBulletin — 05 Sep 2026

गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

12 hours ago

MahaBulletin — 03 Sep 2026

मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…

3 days ago

MahaBulletin — 01 Sep 2026

सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…

5 days ago

MahaBulletin — 31 Aug 2026

रविवार, ३० ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघातांची…

6 days ago

MahaBulletin — 29 Aug 2026

शुक्रवार, २८ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 5 बातम्या 📰 चाकणमध्ये…

1 week ago

MahaBulletin — 28 Aug 2026

बुधवार, २६ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ चाकण…

1 week ago

This website uses cookies.