महाबुलेटीन न्यूज : शैलेश काटे
इंदापूर : ‘राष्ट्रीय क्रीडा दिना’निमित्त इंदापूर तालुका क्रीडा शिक्षक संघटनेच्या वतीने मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. खेळाडूंना क्रीडा प्रतिज्ञा देण्यात आली. तसेच राष्ट्रीय खेळाडूंचा सन्मान करण्यात आला.
विख्यात हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांचा २९ ऑगस्ट हा जन्मदिन ‘राष्ट्रीय क्रीडा दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. त्यानिमित्त इंदापूर तालुका क्रीडा संकुल या ठिकाणी आजी माजी राष्ट्रीय खेळाडूंच्या उपस्थितीत मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. खेळाडूंना क्रीडा प्रतिज्ञा देण्यात आली. राष्ट्रीय खेळाडू पैलवान भारत मदने, संकेत माने यांचा सन्मान करण्यात आला.
इंदापूर तालुका क्रीडा शिक्षक संघटनेचे क्रीडा शिक्षक संघटनेचे अध्यक्ष शरद झोळ, खजिनदार अंकुश काळेल व इतर खेळाडूंनी मेजर ध्यानचंद यांच्या कार्यासंदर्भात माहिती दिली. शारीरिक तंदुरुस्तीबाबत मार्गदर्शन करण्यात आले. धावण्याच्या स्पर्धेचे प्रात्यक्षिक घेण्यात आले.
काशिनाथ शेंडगे, प्रताप वीर, डॉ.आशिष दोभाडा, उज्ज्वलकुमार सुतार, नवनाथ बोराटे, नरेंद्र शिंदे, राजेंद्र फडतरे, सतीश म्हेत्रे, गणेश भोंग आदी मान्यवर उपस्थित होते. क्रीडाप्रेमी, कृषी मार्गदर्शक राजेंद्र वाघमोडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
——-
रविवार, २६ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 काळुस…
शनिवार, २५ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 राजकीय…
शुक्रवार, २४ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
गुरुवार, २३ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 आरटीई…
मंगळवार, २१ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🌾 निवृत्त…
सोमवार, २० एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 सिद्धेश्वर…
This website uses cookies.