गुन्हेगारी

राज्यपालांना ट्विटरवरुन अपशब्द वापरून धमकी, तरुणावर गुन्हा दाखल

महाबुलेटन न्युज / प्रतिनिधी
लातुर : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना महाराष्ट्रा विषयी देणं घेणं नाही, तसेच अपमानास्पद लिखाण करून अपशब्द वापरून ट्विटरवरून शिवीगाळ व धमकी दिल्या प्रकरणी एका तरुणावर शिरूरअनंतपाळ ( जि. लातूर ) पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डोंगरगाव बोरी येथील तरुण किशोर मोहीते याने महाराष्ट्राचे राज्यपाल महोदय भगतसिंग कोश्यारी यांच्या विरूध्द ट्विटरवर धमकी देऊन व अपमानास्पद लिखाण केल्याने त्याच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस शिपाई अस्लम बनारस सय्यद यांनी शिरूरअनंतपाळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यावरून त्याच्यावर गुरन. १२६ / २०२० भादवि कलम २९४ / ५०६  प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस निरिक्षक परमेश्वर कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक स्वामी हे पुढील तपास करित आहेत.
———
MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 21 Sep 2026

रविवार, २० सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🏛️ जिल्हा…

7 hours ago

MahaBulletin — 20 Sep 2026

शनिवार, १९ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🏛️ खेड…

1 day ago

MahaBulletin — 19 Sep 2026

बुधवार, १६ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

2 days ago

MahaBulletin — 16 Sep 2026

सोमवार, १४ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 गणेशोत्सवाचा…

5 days ago

MahaBulletin — 14 Sep 2026

रविवार, १३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 💧 इंद्रायणी…

1 week ago

MahaBulletin — 13 Sep 2026

शनिवार, १२ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🏛️ बँक…

1 week ago

This website uses cookies.