निवड/नियुक्ती

राज्यशासनाच्या पद्म पुरस्कार समितीच्या सदस्यपदी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे

राज्यशासनाच्या पद्म पुरस्कार समितीच्या सदस्यपदी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे
महाबुलेटीन न्यूज / शैलेश काटे
इंदापूर : महाराष्ट्र शासनाच्या पद्म पुरस्कार समितीच्या सदस्यपदी इंदापूरचे लोकप्रतिनिधी व विद्यमान राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. समितीचे अध्यक्ष, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड करण्यात आली.
भारत सरकारकडून देण्यात येणाऱ्या सर्वोच्च नागरी पुरस्कारांमध्ये पद्म पुरस्काराचा समावेश आहे. असामान्य व विशेष कार्यासाठी पद्मविभूषण पुरस्कार, उच्चस्तरीय विशेष कार्यासाठी पद्मभूषण पुरस्कार व विशेष कार्यासाठी पद्मश्री पुरस्कार दिले जातात. राष्ट्रपतींची स्वाक्षरी असलेले पुरस्कारपत्र ( सनद ), एक पदक असे पुरस्कारांचे स्वरुप आहे.
पद्म पुरस्कारासाठी व्यक्तींची निवड करण्यासाठी भारताच्या पंतप्रधानांकडून प्रतिवर्षी पद्म पुरस्कार समिती नियुक्त करण्यात येते. ही समिती आलेल्या नामांकनातून पुरस्कारासाठी नावे निश्चित करते. ही नावे समितीद्वारे पंतप्रधान, राष्ट्रपती यांच्याकडे मान्यतेसाठी सादर करण्यात येतात.
या समितीकडे राज्यातून शिफारशी पाठवण्यासाठी राज्य शासन दरवर्षी दहा जणांची  समिती स्थापन करते. यंदा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली आहे. त्यामध्ये दत्तात्रय भरणे यांचा समावेश करण्यात आला आहे. हा मान भरणे यांना पहिल्यांदाच मिळालेला आहे.
●● दरम्यान आपल्या निवडीनंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना राज्यमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की, पुढच्या वर्षीच्या प्रजासत्ताक दिनादिवशी देण्यात येणा-या मानाच्या ‘पद्म’ पुरस्कारांच्या शिफारस समितीच्या सदस्यपदी ही निवड करण्यात आली. ‘पद्म’ पुरस्काराची सामाजिक उंची कायम राखण्याचा निःष्पक्षपाती पणे प्रयत्न केला जाईल, अशी ग्वाही देत निवड समितीतील सर्व सहकार्‍यांचेही त्यांनी अभिनंदन केले.
MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 20 Sep 2026

शनिवार, १९ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🏛️ खेड…

9 hours ago

MahaBulletin — 19 Sep 2026

बुधवार, १६ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

1 day ago

MahaBulletin — 16 Sep 2026

सोमवार, १४ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 गणेशोत्सवाचा…

4 days ago

MahaBulletin — 14 Sep 2026

रविवार, १३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 💧 इंद्रायणी…

6 days ago

MahaBulletin — 13 Sep 2026

शनिवार, १२ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🏛️ बँक…

1 week ago

MahaBulletin — 12 Sep 2026

गुरुवार, १० सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🏛️ पुणे…

1 week ago

This website uses cookies.