शैक्षणिक

न्यू मीडिया सृजन संसार ग्लोबल फाऊंडेशन व सृजन ऑस्टे़्लिया आंतरराष्ट्रीय ई मॅक्झिन आणि राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय भोसरी यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी “शैक्षणिक विषयांमधील अनुवादाच्या नवीन प्रवृत्ती” या विषयावर आंतरराष्ट्रीय वेबिनारचे आयोजन

भोसरी येथील राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचा उपक्रम

महाबुलेटीन न्यूज नेटवर्क
पिंपरी चिंचवड : न्यू मीडिया सृजन संसार ग्लोबल फाऊंडेशन व सृजन आँस्टे़्लिया आंतरराष्ट्रीय ई मॅक्झिन आणि राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय लांडेवाडी, भोसरी, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दि. ८ नोव्हेंबर २०२० दुपारी १ वाजता ( भारत ) “शैक्षणिक विषयांमधील अनुवादाच्या नवीन प्रवृत्ती” या विषयावर आंतरराष्ट्रीय वेबिनारचे आयोजन करण्यात आलेले आहे.

राजमाता जिजाऊ संस्थेच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात नेहमीच वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. सध्याच्या काळातील अनुवादाचे महत्त्व समजून घेऊन ज्ञान-विज्ञान, वाणिज्य, प्रशासन, पत्रकारिता, धर्म दर्शन, राष्ट्रीय एकता, विश्वसंस्कृतीची ओळख इत्यादी क्षेत्रातील अनुवादाचे महत्व व आवश्यकता समजून घेण्यासाठी अनुवादमधील नवीन विशेषता अवगत करण्यासाठी या आंतरराष्ट्रीय वेबिनारचे आयोजन करण्यात आलेले आहे.

या वेबिनारचे उदघाटन भोसरी विधानसभेचे माजी आमदार आणि राजमाता जिजाऊ संस्थेचे अध्यक्ष मा. विलास लांडे करणार आहेत. या वेबिनारचे अध्यक्ष डॉ. जवाहर कर्णावट ( भोपाळ हिंदी भवनचे निदेशक) भूषवणार आहेत. या वेबिनारसाठी इग्नू, दिल्लीचे डॉ. हरिश कुमार सेठी प्रमुख व्याख्याते असतील. या वेबिनारसाठी बीजभाषक म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे हिंदी विभाग प्रमुख, हिंदी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष प्रो. सदानंद भोसले असतील. या वेबिनारसाठी दोहा, कतारच्या शालिनी गर्ग मॅडम विशेष व्याख्यात्या असणार आहेत. दूसरे विशेष व्याख्यात्या सिंगापुरच्या सुश्री हेमा कृपलानी मॅडम असतील. या वेबिनार साठी प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी. एल. भोंग करतील.

या आंतरराष्ट्रीय वेबिनारसाठी सुप्रसिद्ध कवि, न्यू मीडिया विशेषज्ञ ( राष्ट्रपती पुरस्कार घोषित ), सृजन आँस्टे़्लियाचे मुख्य संपादक डॉ. शैलेश शुक्ला उपस्थित असणार आहेत. तसेच सृजन आँस्टे़्लियाचे मुख्य संपादक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती पूनम चतुर्वेदी शुक्ला सुद्धा उपस्थित राहणार आहेत.

या आंतरराष्ट्रीय वेबिनारचे संयोजन महाविद्यालचे हिंदी विभाग प्रमुख डॉ. सजित खांडेकर करणार आहेत. तसेच या वेबिनारसाठी उपप्राचार्या डॉ. नेहा बोरसे, प्रबंधिका अश्विनी भोसले, कला विभाग प्रमुख प्रा. सविता वीर, एन. एस. एस. विभाग प्रमुख प्रा. दिपक पावडे, परीक्षा अधिकारी प्रा. मारुती शिंदे, प्रा. कमलेश जगताप, प्रा. अनिल गंभीरे, डॉ. पोर्णिमा कोल्हे, प्रा. मिनाक्षी मांढरे, प्रा. रेश्मा लोहकरे, प्रा. सुदाम गोडगे आदींनी या कार्यक्रमाचे नियोजन केले आहे .
—–

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 07 Sep 2026

रविवार, ६ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 कामगार…

3 days ago

MahaBulletin — 06 Sep 2026

शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

4 days ago

MahaBulletin — 05 Sep 2026

गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

5 days ago

MahaBulletin — 03 Sep 2026

मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…

7 days ago

MahaBulletin — 01 Sep 2026

सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…

1 week ago

MahaBulletin — 31 Aug 2026

रविवार, ३० ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघातांची…

1 week ago

This website uses cookies.