आरोग्य

राजगुरूनगरला कोरोना लसीकरण केंद्रावर सोशल डिस्टन्सचा फज्जा…

राजगुरूनगरला कोरोना लसीकरण केंद्रावर सोशल डिस्टन्सचा फज्जा…● नागरिकांची तोबा गर्दी, टोकन मात्र तिनशेच…
● नागरिकांनी घातला पोलीस व आरोग्य कर्मचाऱ्यांशी वाद…
● जेष्ठ नागरिक व युवकांमध्ये नाराजी…

महाबुलेटीन न्यूज : नाजीम इनामदार
राजगुरूनगर ( २८ जून ) : कोविड लस घेण्यासाठी राजगुरूनगर येथील मुंबई माता बाल संगोपन केंद्र येथे आज नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. नागरिकांच्या गर्दीने सोशल डिस्टन्सचा अक्षरशः फज्जा उडालेला यावेळी दिसून आले.   येथील आरोग्य कर्मचारी व पोलिसांनी नागरिकांना शिस्त लावण्याचा प्रयत्न केला, परंतु नागरिकांनी केलेल्या एकच गोंधळामुळे लसीकरणला काही वेळ व्यत्यय आला.     

राजगुरूनगर शहरात मुंबई माता बाल संगोपन केंद्रात १८ वर्षावरील लसीकरण सुरु झाले आहे. या दरम्यान तीनशे जणांना लसीकरण केले जाते. आरोग्य विभागाच्या वतीने १० वाजता लसीकरणाला सुरुवात होते. आज दि.२८ जून रोजी लसीकरणासाठी जेष्ठ नागरिकांसह १८ वर्षावरील नागरिकांनी सकाळ पासूनच  लसीकरण केंद्रावर गर्दी केली होती.

सकाळपासून नागरिकांनी लसीकरणासाठी रांगा लावल्या होत्या. आरोग्य विभागाच्या वतीने त्यांना गर्दी होऊ नये म्हणून १ ते ३०० पर्यंत टोकन दिले होते. मात्र तीनशे पेक्षा अधिक नागरिक आल्याने तेही टोकनसाठी आरोग्य विभागाशी वाद घालत होते. लसीकरण केंद्राच्या ठिकाणी झालेली मोठी गर्दी व सोशल डिस्टन्सला दाखवलेली केराची टोपली यामुळे पोलिसांना पाचारण करावे लागले.

आरोग्य विभागाने १ ते ३०० टोकन दिले, त्यानुसार लसीकरण सुरु करण्यात येणार होते. तोच पोलीस या ठिकाणी आले आणि त्यांनी गर्दी टाळण्यासाठी रांगा लावण्याची तंबी दिली. सकाळपासून रांगेत उभे राहून नंतर टोकन घेऊन बाजूला उभे असणारे नागरिक मागे राहणार, म्हणून त्यांनी आरोग्य कर्मचारी आणि पोलिसांशी वाद घालण्यास सुरुवात केली. 

पोलिसांनी अचानक येऊन केलेल्या गोंधळामुळे जेष्ठ नागरिकांसह युवकांनी नाराजी व्यक्त केली. शेवटी टोकन पद्धतीने लसीकरण झाले. दरम्यान पोलीस निरीक्षक यांनी याठिकाणी येऊन गर्दी पांगवली. काही काळाच्या गोंधळानंतर लसीकरण सुरळीत झाले.
००००

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 17 May 2026

शनिवार, १६ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पिंपरी…

3 weeks ago

MahaBulletin — 13 May 2026

रविवार, १० मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 चाकण…

4 weeks ago

MahaBulletin — 10 May 2026

शनिवार, ९ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 वृद्धेचा…

4 weeks ago

MahaBulletin — 09 May 2026

शुक्रवार, ८ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 बिबट्याची…

4 weeks ago

MahaBulletin — 07 May 2026

बुधवार, ६ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 एमआयडीसीतील…

1 month ago

MahaBulletin — 06 May 2026

मंगळवार, ५ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 बालकावर…

1 month ago

This website uses cookies.