महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी
राजगुरूनगर : पुणे जिल्ह्यात अग्रगण्य असलेल्या राजगुरूनगर सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी विजयाताई रामदास शिंदे यांची बिनविरोध निवड झाली आहे. बँकेचे मावळते अध्यक्ष गणेश थिगळे यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिल्याने हि जागा रिक्त झाली होती.
अध्यासी अधिकारी श्रीकांत श्रीखंडे यांच्या अधिपत्याखाली मंगळवार दि. ८ सप्टेंबर २०२० रोजी बँकेच्या मुख्य कार्यालयाच्या सभागृहात निवडणूक कार्यक्रम घेण्यात आला. या निवडणुकीत विजयाताई शिंदे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बँकेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आल्याचे श्रीकांत श्रीखंडे यांनी घोषित केले. त्यांच्या उमेदवारीस राजेंद्र वाळुंज यांनी सूचक, तर हेमलता टाकळकर यांनी अनुमोदन दिले.
यावेळी बँकेचे प्रभारी अध्यक्ष व विद्यमान उपाध्यक्ष अरुण थिगळे, जेष्ठ संचालक प्रताप आहेर, ऍड. मुकुंद आवटे, किरण आहेर, किरण मांजरे, ऍड. दत्तात्रय गोरे, सतीश नाईकरे पाटील, गणेश थिगळे, राजेंद्र वाळुंज, राहुल तांबे, धनंजय कहाणे, हेमलता टाकळकर, दिनेश ओसवाल, परेश खांगटे यांच्यासह सहाय्यक निवडणूक अधिकारी मुलाणी, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शांताराम वाकचौरे, उपसरव्यवस्थापक संजय संजय ससाणे, अमृत टाकळकर, सहाय्यक सरव्यवस्थापक दिलीप मलघे आदी उपस्थित होते.
निवडीनंतर नवनिर्वाचित अध्यक्षा विजयाताई शिंदे यांनी सर्वांना विश्वासात घेऊन संस्था व सभासदांचे हिताचे निर्णय घेत कामकाज करणार असल्याचे सांगितले. सर्व संचालकांनी टाकलेला विश्वास सार्थ करेल, अशी ग्वाही देऊन संचालकांनी बिनविरोध निवडून दिल्याबद्दल त्यांनी सर्व संचालकांचे आभार मानले.
रविवार, ६ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 कामगार…
शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…
सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…
रविवार, ३० ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघातांची…
This website uses cookies.