राष्ट्रीय

राजगुरूनगर मध्ये भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व हुतात्मा राजगुरू यांच्या 114 व्या जयंतीचे आयोजन, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी राहणार उपस्थित

महाबुलेटीन न्यूज

राजगुरूनगर : हुतात्मा राजगुरु जयंती दिनी २४ ऑगस्ट रोजी येथील रिद्धी सिद्धी मंगल कार्यालय येथे भारतीय स्वातंत्र्य अमृत महोत्सव व हुतात्मा राजगुरू यांच्या ११४ व्या जयंतीचे आयोजन करण्यात आले आहे. देशभर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना हुतात्मा राजगुरू यांच्या जन्मभूमीमध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्याचे महामहीम राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, विरोधी पक्ष नेते अजित दादा पवार, खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार दिलीपशेठ मोहिते पाटील, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील तसेच शहीद राजगुरू, भगतसिंग, सुखदेव, बटुकेश्वर दत्त, बाबू गेणू, विष्णू गणेश पिंगळे यांचे वंशज उपस्थित राहणार आहेत.

राजगुरूनगर जवळील चांडोली येथील रिद्धी सिद्धी मंगल कार्यालयात सकाळी १०.३० वाजता या हा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी शहीद परिवार वारस यांचा सन्मान सोहळा आयोजित केला आहे.

भारतीय स्वातंत्र्य अमृत महोत्सव समिती खेड तालुका यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबत नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. संपूर्ण लोकसहभागातून हा कार्यक्रम आयोजित केला आहे. अशी माहिती भारतीय स्वातंत्र्य अमृत महोत्सव समिती सदस्य अॅड. निलेश आंधळे, मधुकर गिलबिले, अमर टाटीया, अॅड. मनीषा पवळे, बाळासाहेब सांडभोर, आनंदराव गावडे, किशोर कुमठेकर, पंकज नाईकरे, बाबाजी शिंदे यांनी दिली.

भारतीय स्वातंत्र्य अमृत महोत्सव समिती, खेड तालुका हुतात्मा राजगुरू प्रेमी व सर्व सामाजिक संस्थांच्यावतीने या कार्यक्रमास उपस्थित रहाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

0000

– हनुमंत देवकर ( अध्यक्ष : हुतात्मा राजगुरू पत्रकार संघ, खेड तालुका )

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 25 Apr 2026

शुक्रवार, २४ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

2 days ago

MahaBulletin — 24 Apr 2026

गुरुवार, २३ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 आरटीई…

3 days ago

MahaBulletin — 21 Apr 2026

मंगळवार, २१ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🌾 निवृत्त…

6 days ago

MahaBulletin — 21 Apr 2026

सोमवार, २० एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 सिद्धेश्वर…

6 days ago

MahaBulletin — 20 Apr 2026

रविवार, १९ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 खेडमध्ये…

7 days ago

MahaBulletin — 20 Apr 2026

शनिवार, १८ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🏛️ आमदार…

7 days ago

This website uses cookies.