खेड

राजगुरुनगरमध्ये गोकुळ अष्टमी व पंतमहाराज जन्मोत्सव साजरा

राजगुरुनगरमध्ये गोकुळ अष्टमी व श्री समर्थ पंत महाराज ( बाळेकुंद्री ) जन्मोत्सव उत्साहात साजरा …
महाबुलेटीन नेटवर्क । प्रतिनिधी
राजगुरूनगर : येथील भीमातीरी श्री दत्त विश्वस्त मंडळाच्या वतीने सालाबाद प्रमाणे याही वर्षी गोकुळ अष्टमी व श्री समर्थ पंत महाराज (बाळेकुंद्री) यांच्या जन्मोत्सवाचे आयोजन मंडळाच्या वतीने मंगळवार व बुधवार ( दि. ११ व १२ ऑगस्ट ) रोजी करण्यात आले.
यानिमित्त मंगळवार ( दि .११) रोजी सकाळी आभिषेक व महापूजा यजमान हनुमंत सैद यांचे हस्ते करुन उत्सवास सुरुवात झाली. दुपारी श्री दत्त विश्वस्त मंडळाचे भजन व सायंकाळी जन्मोत्सव, आरती व प्रसाद वाटप पार पडले. बुधवार ( दि. १२ ) रोजी दुपारी श्री दत्त विश्वस्त मंडळाचे भजन होवून श्रींची आरती आणि प्रसाद वाटपाने उत्सवाची सांगता झाली.
कार्यक्रमाचे संयोजन मंडळाचे अध्यक्ष प्रताप आहेर, रविंद्र जोशी, जगन्नाथ कुंभार, हनुमंत सैद, प्रकाश तेंडोलकर, प्रभाकर जाधव, पांडुरंग साळुंके, नथुराम तनपुरे, रविंद्र सांडभोर, माणिक तनपुरे, अजित डोळस, नारायण जाधव, समीर आहेर, बाबा साळुंके, अॅड . गणेश होनराव, मंदार पिसाळ, शरद चोपडे आदी गुरू बंधूं- भगिनींच्या सहकार्याने साजरा झाला.
कोरोनाचा प्रादूर्भाव लक्षात घेऊन मर्यादीत भाविकांमध्ये उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी भाविकांनी व सर्व गुरू बंधूंनी सोशल डिस्टन्सचे पालन तसेच मास्कचा वापर केला.
MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 20 Sep 2026

शनिवार, १९ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🏛️ खेड…

9 hours ago

MahaBulletin — 19 Sep 2026

बुधवार, १६ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

1 day ago

MahaBulletin — 16 Sep 2026

सोमवार, १४ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 गणेशोत्सवाचा…

4 days ago

MahaBulletin — 14 Sep 2026

रविवार, १३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 💧 इंद्रायणी…

6 days ago

MahaBulletin — 13 Sep 2026

शनिवार, १२ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🏛️ बँक…

1 week ago

MahaBulletin — 12 Sep 2026

गुरुवार, १० सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🏛️ पुणे…

1 week ago

This website uses cookies.