महाबुलेटीन न्यूज । विशेष प्रतिनिधी
रायगड : रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात तळई येथे दरड कोसळून ३६ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. तर, ४० जण अद्याप बेपत्ता असून त्यांचा शोध सुरु आहे.
या ठिकाणी एनडीआरएफकडून बचाव कार्य सुरू आहे. पूर आणि दरडी कोसळल्यामुळे पथकाला घटनास्थळी पोहचण्यास अडथळे निर्माण होत होते. त्यानंतर आज सकाळपासून बचाव कार्य सुरू आहे.
काल संध्याकाळी चारच्या सुमारास रायगडमधील तळई गावात दरड कोसळली. या दरडीच्या ढिगाऱ्याखाली गावातील सुमारे ३५ घरे गाडली गेली होती. मुसळधार पावसामुळे या दुर्घटनास्थळी मदत पोहोचवणे शक्य झाले नाही.
दरम्यान, स्थानिक ग्रामस्थांनीच मदतकार्य सुरू करून येथील गाडल्या गेलेल्या घरांमधून तब्बल ३२ मृतदेह बाहेर काढले आहेत. तर अद्यापही ८० ते ९० मृतदेह ढिगाऱ्याखाली दबले गेले असल्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
००००
सोमवार, ८ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 गुन्हेगारीवर…
रविवार, ७ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 खेडमध्ये…
शनिवार, १६ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पिंपरी…
रविवार, १० मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 चाकण…
शनिवार, ९ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 वृद्धेचा…
शुक्रवार, ८ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 बिबट्याची…
This website uses cookies.