महाबुलेटीन न्यूज l प्रसन्नकुमार देवकर
पुणे : जिल्ह्यातील महाळुंगे गावांमध्ये सूर्यमुखी मंदिराला देखील मतदानाचा अधिकार निवडणूक मतदार यादी मध्ये नाव आल्याने मिळाला आहे. यामुळे या गणेश मंदिरातील गणपतीला देखील मतदानाचा अधिकार निवडणूक आयोगाने दिला असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. ��बारामती लोकसभा मतदार संघातील विधानसभा मतदार संघ भोर मधील महाळुंगे गावामध्ये यादी भाग क्रमांक 105 मध्ये 240 क्रमांकावर ‘सूर्यमुखी मंदिर’ असे मतदाराचे नाव असून वडिलांचे नाव ‘गणेश मंदिर’ असे छापण्यात आले आहे. गणपती देवता असल्याने त्यांचा वास सर्वत्र असतो असा निवडणूक आयोगाचा समज असावा म्हणून घराचा पत्ता टाकण्यात आलेला नाही. ��बारामती मतदार संघामधील निवडणूक ही चुरशीची मानली जात आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या तारखानुसार बारामती मतदारसंघाची निवडणूक ही अगोदर होणार असून नंतर पुणे, शिरूर व मावळ मतदार संघाची निवडणूक होणार आहे. मुळशी तालुक्यातील शहरा लगत असलेल्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात बोगस मतदारांची नोंद आढळून येत असून यावर कारवाईची मागणी सातत्याने होत असताना देखील याकडे दुर्लक्ष केले जात आहे.
मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…
सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…
रविवार, ३० ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघातांची…
शुक्रवार, २८ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 5 बातम्या 📰 चाकणमध्ये…
बुधवार, २६ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ चाकण…
शनिवार, २२ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
This website uses cookies.