कोरोना

पुणे विभागातील 16 लाख 36 हजार 140 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.. ● पुणे विभागात कोरोना बाधित 17 लाख 16 हजार 819 रुग्ण : विभागीय आयुक्त सौरभ राव

पुणे विभागातील 16 लाख 36 हजार 140 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी..
● पुणे विभागात कोरोना बाधित 17 लाख 16 हजार 819 रुग्ण : विभागीय आयुक्त सौरभ राव
महाबुलेटीन न्यूज नेटवर्क । प्रसन्नकुमार देवकर
पुणे, दि. 2 जुलै : पुणे विभागातील 16 लाख 36 हजार 140 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 17 लाख 16 हजार 819 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 44 हजार 889 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 35 हजार 790 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.08 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 95.30 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

पुणे जिल्हा
पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 10 लाख 52 हजार 313 रुग्णांपैकी 10 लाख 24 हजार 121 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 10 हजार 353 आहे. कोरोनाबाधित एकूण 17 हजार 839 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 1.70 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 97.32 टक्के आहे.

सातारा जिल्हा
सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 94 हजार 291 रुग्णांपैकी 1 लाख 80 हजार 729 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 8 हजार 880 आहे. कोरोनाबाधित एकूण 4 हजार 682 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 64 हजार 22 रुग्णांपैकी 1 लाख 57 हजार 528 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 91 आहे. कोरोनाबाधित एकूण 4 हजार 403 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सांगली जिल्हा
सांगली जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 46 हजार 850 रुग्णांपैकी 1 लाख 33 हजार 127 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 9 हजार 634 आहे. कोरोनाबाधित एकूण 4 हजार 89 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 59 हजार 343 रुग्णांपैकी 1 लाख 40 हजार 635 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 13 हजार 931 आहे. कोरोनाबाधित एकूण 4 हजार 777 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये 5 हजार 56 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 1 हजार 180, सातारा जिल्ह्यात 924, सोलापूर जिल्ह्यात 486, सांगली जिल्ह्यात 944 तर कोल्हापूर जिल्ह्यात 1 हजार 522 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण
पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांमध्ये एकूण 3 हजार 296 आहे. पुणे जिल्हयामध्ये 870, सातारा जिल्हयामध्ये 584, सोलापूर जिल्हयामध्ये 365, सांगली जिल्हयामध्ये 566 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 911 रुग्णांचा समावेश आहे.

विभागातील लसीकरणाचे प्रमाण
पुणे विभागात आजपर्यंत लसीकरण झालेल्या नागरिकांमध्ये पुणे जिल्ह्यामध्ये 40 लाख 62 हजार 774, सातारा जिल्ह्यामध्ये 8 लाख 87 हजार 250, सोलापूर जिल्हयामध्ये 7 लाख 25 हजार 667, सांगली जिल्हयामध्ये 8 लाख 29 हजार 306 तर कोल्हापूर जिल्हयामध्ये 12 लाख 82 हजार 922 नागरिकांचा समावेश आहे.

पुणे विभागातील सर्व्हेक्षण 
आजपर्यत विभागामध्ये एकुण 1 कोटी 7 लाख 18 हजार 882 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 17 लाख 16 हजार 819 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.

(टिप :- दि. 1 जुलै 2021 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार) 
****

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 07 Sep 2026

रविवार, ६ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 कामगार…

2 days ago

MahaBulletin — 06 Sep 2026

शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

3 days ago

MahaBulletin — 05 Sep 2026

गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

4 days ago

MahaBulletin — 03 Sep 2026

मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…

6 days ago

MahaBulletin — 01 Sep 2026

सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…

1 week ago

MahaBulletin — 31 Aug 2026

रविवार, ३० ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघातांची…

1 week ago

This website uses cookies.