पुणे

पुणे कोरोना अपडेट: विभागाने केला कोरोनाबाधितांचा 1 लाखाचा टप्पा पार

विभागात कोरोना बाधित 1 लाख 10 हजार 791 रुग्ण : विभागीय आयुक्त सौरभ राव
पुणे विभागातील 69 हजार 221 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी
महाबुलेटीन न्यूज / विषेश प्रतिनिधी
पुणे : पुणे विभागातील 69 हजार 221 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 1 लाख 10 हजार 791  झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 38 हजार 645 आहे. विभागात कोरोनाबाधीत एकुण 2 हजार 925 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 1 हजार 86  रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत. पुणे विभागामध्ये बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 62.48 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण  2.64  टक्के इतके आहे, अशी  माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
यापैकी पुणे जिल्हयातील 88  हजार 584 बाधीत रुग्ण  असून कोरोना बाधित 58  हजार 318 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 28  हजार 231  आहे.   यामध्ये पुणे महानगरपालिका क्षेत्रातील  17 हजार 793 , पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील 6 हजार 729, जिल्हा शल्य चिकीत्सक यांच्याकडील 82, पुणे कॅन्टोंन्मेंट 137, खडकी विभागातील 25 व  ग्रामीण क्षेत्रातील 3  हजार 465  रुग्णांचा समावेश आहे.
              पुणे जिल्हयात कोरोनाबाधित एकूण 2 हजार 35 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये पुणे महानगरपालिका क्षेत्रातील 1 हजार 361 , पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील 377, जिल्हा शल्य चिकीत्सक यांच्याकडील 66, पुणे कॅन्टोंन्मेंट 31, खडकी विभागातील 43, व ग्रामीण क्षेत्रातील 157  रुग्णांचा समावेश आहे. तसेच   808  रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे जिल्हयामध्ये बरे  होणा-या रुग्णांचे प्रमाण 65.83  टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 2.30 टक्के इतके आहे.
कालच्या बाधीत रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 4 हजार  818 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 3 हजार 819, सातारा जिल्ह्यात 234, सोलापूर जिल्ह्यात 224,  सांगली जिल्ह्यात 274  तर कोल्हापूर जिल्ह्यात 267 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत 4 हजार 83 रुग्ण असून 2 हजार 84  बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत.  ॲक्टीव रुग्ण संख्या 1  हजार 869 आहे. कोरोनाबाधित एकूण 130  रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हयातील 8 हजार 861 कोरोना बाधीत रुग्ण असून 5   हजार 144 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3  हजार 215 आहे. कोरोना बाधित एकूण 502 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत 2 हजार 726 रुग्ण असून 813 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत.   ॲक्टीव रुग्ण संख्या 1  हजार 836  आहे. कोरोना बाधित एकूण 77  रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हयातील 6 हजार 537 कोरोना बाधीत रुग्ण असून 2  हजार 862  बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3  हजार  494 आहे. कोरोना बाधित एकूण 181  रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आजपर्यत विभागामध्ये एकुण 5 लाख 22 हजार 860 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी   1 लाख 10 हजार 791 नमून्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आहे.
( टिप :- दि. 1 ऑगस्ट 2020 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )
admin

Recent Posts

MahaBulletin — 23 Oct 2026

गुरुवार, २२ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 दिवेआगर…

2 days ago

MahaBulletin — 22 Oct 2026

बुधवार, २१ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 राजगुरुनगरमध्ये…

3 days ago

MahaBulletin — 20 Oct 2026

सोमवार, १९ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 अन्नपदार्थ…

5 days ago

MahaBulletin — 19 Oct 2026

रविवार, १८ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🌾 खेडमध्ये…

6 days ago

MahaBulletin — 18 Oct 2026

गुरुवार, १५ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 💧 खेड…

1 week ago

MahaBulletin — 13 Oct 2026

सोमवार, १२ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 दिल्लीत…

2 weeks ago

This website uses cookies.