पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर कारचा भीषण अपघात, चारजण जखमी

कारवरील नियंत्रण सुटल्याने झाला अपघात
महाबुलेटीन नेटवर्क : विशेष प्रतिनिधी
तळेगाव दाभाडे : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या भरधाव चारचाकी कारला भीषण अपघात झाला. या अपघातात कारमधील तिघे जण गंभीर तर एक जण किरकोळ जखमी झाले आहेत. हि घटना आज सकाळी दहा वाजता गहुंजे हद्दीत घडली. जखमींना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. कारवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाला.
या अपघातात सुदीप घोश, शुभम फुंडे ,अनुराग मिश्रा, हे तिघे गंभीर जखमी झाले असून प्रसाद पाटील किरकोळ जखमी झाला आहे. हे सर्वजण उल्हासनगर मुंबई येथून मारुती सुझुकी सियाझ या कारने पुण्याकडे जात होते. एक्स्प्रेस वेवरील गहुंजे स्टेडियमजवळ हा अपघात झाला.
हा अपघात इतका भीषण होता की, यात कारचा पार चुराडा झाला. भरधाव वेगात असताना अचानक कारवरील नियंत्रण सुटले आणि कार एक्स्प्रेसवेवर सुरक्षेकरिता लावण्यात आलेल्या लोखंडी रेलिंग तोडून उलटली. या कारचा वेग इतका होता की, महामार्गावर लावण्यात आलेल्या रेलिंग अक्षरशः तोडून दूर फेकले गेले.
या अपघातातील जखमींना एक्स्प्रेसवेवरील ट्रामा सेंटर येथे हलविण्यात आले आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वरील भरधाव वाहनांवर महामार्ग पोलिसांकडून दरोज स्पीडगनच्या माध्यमातून कारवाई करण्यात येते. परंतु, तरी देखील वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करत आहे. काही चालक आपला जीव धोक्यात टाकून महामार्गावर अपघाताला कारणीभूत ठरत आहे. स्वतःचा तसंच इतरांच्या जीव धोक्यात घालताना पाहायला मिळत आहे.
admin

Recent Posts

MahaBulletin — 05 Sep 2026

गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

4 hours ago

MahaBulletin — 03 Sep 2026

मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…

2 days ago

MahaBulletin — 01 Sep 2026

सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…

4 days ago

MahaBulletin — 31 Aug 2026

रविवार, ३० ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघातांची…

5 days ago

MahaBulletin — 29 Aug 2026

शुक्रवार, २८ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 5 बातम्या 📰 चाकणमध्ये…

1 week ago

MahaBulletin — 28 Aug 2026

बुधवार, २६ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ चाकण…

1 week ago

This website uses cookies.