कोरोना

पुणे कोरोना अपडेट : विभागातील 62 हजार 370 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी

विभागात कोरोना बाधित 1 लाख 3 हजार 411 रुग्ण : विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर
महाबुलेटीन नेटवर्क / विशेष प्रतिनिधी
पुणे : पुणे विभागातील 62 हजार 370 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 1 लाख 3 हजार 411 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 38 हजार 271 आहे. विभागात कोरोनाबाधीत एकुण 2 हजार 770 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 1 हजार 21  रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत. पुणे विभागामध्ये बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 60.31 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण  2.68 टक्के इतके आहे, अशी  माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
यापैकी पुणे जिल्हयातील  82 हजार 924 बाधीत रुग्ण  असून कोरोना बाधित 52  हजार 450  रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 28  हजार 542 आहे.                                                                                                                                                                    यामध्ये पुणे महानगरपालिका क्षेत्रातील 19 हजार 170 , पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील 6 हजार 822, जिल्हा शल्य चिकीत्सक यांचेकडील 105 , पुणे कॅन्टोंन्मेंट  144, खडकी विभागातील 20, ग्रामीण क्षेत्रातील 2  हजार 281, यांच्याकडील  रुग्णांचा समावेश आहे.
              पुणे जिल्हयात कोरोनाबाधित एकूण 1 हजार 932 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये पुणे महानगरपालिका क्षेत्रातील 1 हजार 315, पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील 350, जिल्हा शल्य चिकीत्सक यांच्याकडील 58, पुणे कॅन्टोंन्मेंट 31 , खडकी विभागातील 41 , व ग्रामीण क्षेत्रातील 137, रुग्णांचा समावेश आहे. तसेच  738 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे जिल्हयामध्ये बरे  होणा-या रुग्णांचे प्रमाण  63.25 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण  2.33 टक्के इतके आहे.
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 4 हजार 754 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 3 हजार 825, सातारा जिल्ह्यात 162 , सोलापूर जिल्ह्यात 204,  सांगली जिल्ह्यात  222 तर कोल्हापूर जिल्ह्यात  341 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत 3 हजार 824  रुग्ण असून  1  हजार 982   बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत.  ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 713 आहे. कोरोनाबाधित एकूण 129  रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हयातील 8 हजार 443 कोरोना बाधीत रुग्ण असून  4 हजार 817  बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या  3 हजार 143 आहे. कोरोना बाधित एकूण  483 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत 2 हजार 169 रुग्ण असून  612 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत.   ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार  487 आहे. कोरोना बाधित एकूण  70  रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हयातील 6 हजार 51  कोरोना बाधीत रुग्ण असून  2  हजार 509 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 386 आहे. कोरोना बाधित एकूण 156  रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आजपर्यत विभागामध्ये एकुण 5 लाख 1 हजार  356 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी  4 लाख 95 हजार  680 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. प्राप्त अहवालांपैकी  1 लाख 3  हजार 411 नमून्यांचा अहवाल पॉझीटीव्ह आहे.
( टिप :- दि. 31 जुलै 2020 रोजी दुपारी  3.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )
admin

Recent Posts

MahaBulletin — 31 Jul 2026

गुरुवार, ३० जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 खेडमध्ये…

1 day ago

MahaBulletin — 29 Jul 2026

मंगळवार, २८ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 खेड…

3 days ago

MahaBulletin — 27 Jul 2026

रविवार, २६ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 नीट…

5 days ago

MahaBulletin — 26 Jul 2026

शनिवार, २५ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 💧 खेडमध्ये…

6 days ago

MahaBulletin — 23 Jul 2026

बुधवार, २२ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 5 बातम्या 💧 अतिवृष्टी…

1 week ago

MahaBulletin — 20 Jul 2026

रविवार, १९ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ पुरंदर…

2 weeks ago

This website uses cookies.