पुणे विभागातील 34 हजार 55 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी : विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर

विभागात कोरोना बाधित 55 हजार 608  रुग्ण
महाबुलेटीन नेटवर्क / विशेष प्रतिनिधी
पुणे : पुणे विभागातील 34 हजार 55 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 55 हजार 608 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 19 हजार 846 आहे. विभागात कोरोनाबाधीत एकुण 1 हजार 707 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 672 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत. पुणे विभागामध्ये बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 61.24 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 3.07  टक्के इतके आहे, अशी  माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.
यापैकी पुणे जिल्हयातील 46 हजार 276 बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित 28 हजार 921 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 16 हजार 139 आहे. यामध्ये पुणे महानगरपालिका क्षेत्रातील 11 हजार 543, पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील 3 हजार 136 व पुणे कॅन्टोंन्मेंट 121, खडकी विभागातील 44, ग्रामीण क्षेत्रातील 1 हजार 218, जिल्हा शल्य चिकीत्सक यांच्याकडील 77 रुग्णांचा समावेश आहे.
पुणे जिल्हयात कोरोनाबाधित एकूण 1 हजार 216 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये पुणे महानगरपालिका क्षेत्रातील 921, पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील 167 व पुणे कॅन्टोंन्मेंट 29, खडकी विभागातील 20, ग्रामीण क्षेत्रातील 54, जिल्हा शल्य चिकीत्सक यांच्याकडील 25 रुग्णांचा समावेश आहे. तसेच 463 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे जिल्हयामध्ये बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 62.50 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 2.63 टक्के इतके आहे.
कालच्या बाधीत रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 2 हजार 386 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 1 हजार 915, सातारा जिल्ह्यात 71, सोलापूर जिल्ह्यात 212, सांगली जिल्ह्यात 65 तर कोल्हापूर जिल्ह्यात 123 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत 2 हजार 144 रुग्ण असून 1 हजार 179 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत.  ॲक्टीव रुग्ण संख्या 894 आहे. कोरोनाबाधित एकूण 71  रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हयातील 4 हजार 709 कोरोना बाधीत रुग्ण असून 2 हजार 601 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 753 आहे. कोरोना बाधित एकूण 355 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत 841 रुग्ण असून 420 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या  396 आहे. कोरोना बाधित एकूण 25 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हयातील 1 हजार 638 कोरोना बाधीत रुग्ण असून 934 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 664 आहे. कोरोना बाधित एकूण 40 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आजपर्यत विभागामध्ये एकुण 2 लाख 79 हजार 118 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 2 लाख 73 हजार 519 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 5 हजार 599 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी  2 लाख 17 हजार 339 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून  55 हजार 608 नमून्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आहे.
————
( टिप :- दि. 17 जुलै 2020 रोजी दुपारी 3.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )
admin

Recent Posts

MahaBulletin — 15 Jun 2026

रविवार, १४ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ भीमाशंकर…

3 days ago

MahaBulletin — 14 Jun 2026

शनिवार, १३ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पुण्यात…

4 days ago

MahaBulletin — 13 Jun 2026

शुक्रवार, १२ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 गायरान…

5 days ago

MahaBulletin — 12 Jun 2026

गुरुवार, ११ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 विषारी…

6 days ago

MahaBulletin — 11 Jun 2026

बुधवार, १० जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 दारूकांडानंतर…

7 days ago

MahaBulletin — 10 Jun 2026

सोमवार, ८ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 गुन्हेगारीवर…

1 week ago

This website uses cookies.