प्रशासकीय बदल्या : विभागीय आयुक्तपदाचा कारभार सौरव राव यांच्याकडे,साखरआयुक्त म्हणून शेखर गायकवाड

महाबुलेटिन नेटवर्क
पुणे : आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. विभागीय आयुक्त पदाची जबाबदारी सौरव राव यांच्याकडे तर साखर आयुक्त म्हणून शेखर गायकवाड यांनी बदली झाली आहे.
     विभागीय आयुक्त पदाची विशेष जबाबदारी राव यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. २००३ बॅचचे अधिकारी असणारे सौरव राव साखर आयुक्त म्हणून नियुक्तीस होते. पुणे महानगर पालिकेच्या आयुक्तपदी नेमणुकीस असणारे शेखर गायकवाड यांना साखर आयुक्त पदावर नेमणूक देण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा प्रभाव या बदल्यांवर असल्याचे बोलले जात आहे.
     बदली झालेल्या इतर अधिकाऱ्यांमध्ये पीएमआरडीएचे मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रम कुमार यांची पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तपदावर वर्णी लागली आहे. ते २००४ च्या बॅचचे अधिकारी आहेत. पुणे विभागाचे कृषी आयुक्त सुहास दिवसे यांची बदली पुणे पीएमआरआरडीएच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर बदली झाली आहे. आदीवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी जितेंद्र डूडी यांची सांगलीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर बदली झाली आहे. या बदल्यांवर अजित पवार यांचा प्रभाव असल्याची चर्चा आहे.
admin

Recent Posts

MahaBulletin — 11 Jun 2026

बुधवार, १० जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 दारूकांडानंतर…

5 hours ago

MahaBulletin — 10 Jun 2026

सोमवार, ८ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 गुन्हेगारीवर…

1 day ago

MahaBulletin — 08 Jun 2026

रविवार, ७ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 खेडमध्ये…

3 days ago

MahaBulletin — 17 May 2026

शनिवार, १६ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पिंपरी…

4 weeks ago

MahaBulletin — 13 May 2026

रविवार, १० मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 चाकण…

4 weeks ago

MahaBulletin — 10 May 2026

शनिवार, ९ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 वृद्धेचा…

1 month ago

This website uses cookies.