महाबुलेटीन न्यूज : प्रसन्नकुमार देवकर
पुणे दि. 22 : प्रधानमंत्री किसान सम्मान योजने अंतर्गत महाराष्ट्र राज्यास लाभार्थी भौतिक तपासणी बाबी अंतर्गत देश पातळीवरील सर्वोत्कृष्ट कामाचे पारितोषिक जाहीर झाले आहे. याचबरोबर उत्कृष्ट काम करणा-या जिल्ह्यांमध्ये राज्यातील पुणे व अहमदनगर जिल्ह्यास अनुक्रमे लाभार्थी तक्रार निवारण व भौतिक तपासणी बाबी अंतर्गत प्रथम क्रमांकाचे बक्षीस जाहीर झाले आहे. पुणे जिल्हयाचा गौरव होत असल्याने जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.
बक्षीस वितरणाचा कार्यक्रम केंद्रीय कृषी मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 24 फेब्रुवारी 2021 रोजी अे. पी. शिंदे सभागृह, एनअेएससी कॉम्प्लेक्स, पुसा, नवी दिल्ली येथे दुपारी 12 ते 1 च्या दरम्यान संपन्न होणार आहे.
———-
गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…
सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…
रविवार, ३० ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघातांची…
शुक्रवार, २८ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 5 बातम्या 📰 चाकणमध्ये…
बुधवार, २६ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ चाकण…
This website uses cookies.