पुणे जिल्हा

पोलीस पाटलांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करू : महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची ग्वाही ● पोलीस पाटलांच्या शिष्टमंडळाने घेतली महसूलमंत्र्यांची भेट

 

महाबुलेटीन न्यूज नेटवर्क : हनुमंत देवकर
राजगुरूनगर / संगमनेर : महाराष्ट्र राज्याचे महसूलमंत्री नामदार श्री. बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेर निवासस्थानी महाराष्ट्रातील पोलीस पाटलांना महसूल खात्यांतर्गत येणाऱ्या अडचणी व इतर बाबींसंदर्भात भेट घेऊन निवेदन देण्यात आले. 

■ महाराष्ट्रातील रिक्त पोलीस पाटलांच्या जागा त्वरित भरण्यात याव्यात, काही ठिकाणी पोलीस पाटील भरती झाली आहे, परंतु मराठवाड्यात आदेश असून देखील भरती झालेली नाही, पोलीस पाटलांवर वाळू माफियांकडून मुरूम, माती उपसा करणाऱ्यांकडून हल्ले होतात त्यावर गांभीर्याने विचार करण्यात यावा, वाळूचा साठा व इतर महसूल असा मुद्देमाल फक्त पोलिस पाटील यांच्या ताब्यात न देता सर्कल, तलाठी, कोतवाल, ग्रामसेवक, सरपंच या सर्वांच्या ताब्यात घेऊन सर्वांना जबाबदार धरण्यात यावे, महसूल खात्याकडून पोलीस पाटलांना सन्मानाची वागणूक दिली जावी, महसूल विभागाकडून पोलीस पाटलांना विशेष कामगिरीबद्दल सन्मानित करण्यात यावे, आदी मागण्यांचे निवेदन यावेळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना देण्यात आले.

त्यासंदर्भात सविस्तर चर्चा करून लवकरच मंत्रालय स्तरावर मीटिंग बोलावून सचिव व इतर अधिकाऱ्यांशी चर्चा करून मार्ग काढला जाईल व मागण्यासंदर्भात निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिले व पोलिस पाटलांच्या सर्व मागण्यांचा सकारात्मक व सहानुभूतीपूर्वक विचार केला जाईल, अशी ग्वाही नामदार थोरात यांनी दिली.

यावेळी पोलीस पाटील शिष्टमंडळामध्ये महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील संघाचे राज्याध्यक्ष बाळासाहेब बाजीराव शिंदे पाटील, पुणे जिल्हा अध्यक्ष साहेबराव राळे पाटील, पुणे जिल्हा महिला आघाडी अध्यक्ष तृप्तीताई मांडेकर, संगमनेर तालुका अध्यक्ष अशोकराव थेटे पाटील, खेड तालुका कार्याध्यक्ष अमोल पाचपुते पाटील, पुणे जिल्हा महिला सदस्य रंजनाताई पिचड, पोलीस पाटील मीराताई सावंत, संगमनेर उपाध्यक्ष नानासाहेब शिंदे, संगमनेर उपाध्यक्ष राजेंद्र कानवडे, संगमनेर सचिव रमेश वर्पे तसेच बाळासाहेब थोरात यांचे कॉलेज मित्र व बाळासाहेब शिंदे पाटील यांचे चुलते विनायकराव शिंदे उपस्थित होते.
——

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 21 Apr 2026

मंगळवार, २१ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🌾 निवृत्त…

1 day ago

MahaBulletin — 21 Apr 2026

सोमवार, २० एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 सिद्धेश्वर…

1 day ago

MahaBulletin — 20 Apr 2026

रविवार, १९ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 खेडमध्ये…

2 days ago

MahaBulletin — 20 Apr 2026

शनिवार, १८ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🏛️ आमदार…

2 days ago

MahaBulletin — 18 Apr 2026

शुक्रवार, १७ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पतसंस्था…

4 days ago

MahaBulletin — 18 Apr 2026

मंगळवार, १४ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पतसंस्था…

4 days ago

This website uses cookies.