गुन्हेगारी

पोलीस अधिकाऱ्याचा युनिफॉर्म घालून हॉटेल चालकाला दमदाटी करणाऱ्या चाकण येथील तोतया पोलीस अधिकारी इसमास अटक

महाबुलेटीन न्यूज
चाकण :
पनवेल शहर पोलीस स्टेशन, नवीमुंबई पोलीस अधिकाऱ्याचा गणवेष परिधान करुन हॉटेलमध्ये जावून दमदाटी करणा-या चाकण येथील तोतया पोलीस अधिकारी इसमास अटक करण्यात आली आहे.

दिनांक २७/०३/२०२४ रोजी २०.०० वाजता आरोपी नामे सलमान तजमुददीन मुलाणी ( वय ३१ वर्षे, धंदा चिकन शॉप, राहणार यशोदिप कॉम्पलेक्स, माणिक चौक, चाकण, पुणे ) याने पोलीस उपनिरीक्षकचा युनिफॉर्म घालून स्वतः पोलीस अधिकारी आहे, असे भासवून सिताज हॉटेल (गोल्ड डिग्गर) कोळखे, पनवेल येथे जावून हॉटेल मॅनेजर यांना “काल माझे मैत्रीणीला हॉटेलमध्ये शिवीगाळ करुन तिला कामावरुन का काढून टाकले, चल आत्ताचे आत्ता तिचा हिशोब कर तिला लगेच कामावर घे नाहीतर तुझे हॉटेल बंद करुन टाकीन” अशी धमकी देवून हॉटेल मॅनेजर यांना शिवीगाळ करुन मारहाण केली.

त्यावेळी हॉटेल मॅनेजर यांनी पनवेल शहर पोलीस ठाण्यात फोन करुन पुण्यावरुन पोलीस अधिकाऱ्याचा ड्रेस घालून आलेल्या पोलीस अधिकाऱ्याने त्यांना विनाकारण धमकावून मारहाण केलेबाबत माहिती दिली. त्यावेळी सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून पनवेल शहर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी हॉटेल सिताज येथे जावून स्वतःला पोलीस उपनिरीक्षक म्हणुन सांगणारे सलमान तजमुददीन मुलाणी याचेकडे कौशल्यपुर्वक सखोल विचारपुस केली असता तो पोलीस अधिकारी नसल्याचे निष्पन्न झाले.

हॉटेल मॅनेजर यांची तकार घेवून आरोपी विरुध्द पनवेल शहर पोलीस ठाण्यात दिनांक २८/०३/२०२४ रोजी ००.५६ वाजता गुन्हा रजि.नंबर १९८/२०२४ भादवि १७०, ३२३, ५०४ प्रमाणे दाखल करण्यात आला आहे.

आरोपी नामे सलमान तजमुददीन मुलाणी हा मुळचा चाकण, पुणे येथे राहणारा असून त्याने पोलीस नसताना तोतयागीरी करुन पोलीस उपनिरीक्षक प्रमाणे युनिफॉर्म घालून हॉटेल मॅनेजरला मारहाण करुन शिवीगाळ केलेली आहे. आरोपी याने पोलीस अधिकारी असल्याचे सांगून इतर आणखी कोणास फसविले आहे काय ? याबाबत आरोपीकडे तपास करण्यात येत आहे.

सदरची कारवाई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे व पोलीस सह आयुक्त संजय येनपुरे यांनी दिलेल्या सूचनांनुसार व पोलीस उपआयुक्त विवेक पानसरे, परिमंडळ ०२, पनवेल व सहा. पोलीस आयुक्त अशोक राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे, पोनि (गुन्हे) बागवान, पोउपनि अभयसिंह शिंदे, पोउपनि अस्पतवार व डि.बी पथकाचे अमलदार यांनी केली आहे.

MahaBulletinTeam

Recent Posts

MahaBulletin — 15 Jun 2026

रविवार, १४ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ भीमाशंकर…

2 days ago

MahaBulletin — 14 Jun 2026

शनिवार, १३ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पुण्यात…

3 days ago

MahaBulletin — 13 Jun 2026

शुक्रवार, १२ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 गायरान…

4 days ago

MahaBulletin — 12 Jun 2026

गुरुवार, ११ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 विषारी…

5 days ago

MahaBulletin — 11 Jun 2026

बुधवार, १० जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 दारूकांडानंतर…

6 days ago

MahaBulletin — 10 Jun 2026

सोमवार, ८ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 गुन्हेगारीवर…

1 week ago

This website uses cookies.