सण-उत्सव

पोळा सणावर कोरोनाचे संकट

बैलाची पुजा अर्चा घरीच करा,
प्रशासनाचे आवाहान…

 

महाबुलेटीन न्यूज / ओमप्रकाश तांबोळकर
लातुर : पोळा हा आपल्या कृषीप्रधान देशातील व मराठी संस्कृतीतील महत्वाचा सण आहे. मात्र कोरोना वाढतंच असल्याने दक्षता म्हणून सार्वजनिक सुरक्षितता जपण्यासाठी शेतकरी बांधवांनी, सर्जा-राजाचे सामूहिक पूजन न करता आपआपल्या घरी किंवा शेतशिवारातच पोळा सण साजरा करा असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

शेतकऱ्याच पीक चांगल यावं यासाठी बैल ऊन्हा तान्हात दिवसभर शेतात राबत असतात. शेतकरी आणि बैलांचं भावनिक नातं तयार झालेलं असतं. त्यामुळे बैलपोळ्याच्या दिवशी शेतकरी बैलाप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करत असतो. बैलाला सजवून खायला गोडधोड देत त्याच्यावर प्रेम व्यक्त करत असतो. या दिवशी शेतकरी मोठ्या प्रमाणात बैलाला सजवुन मारोती मंदिराला बैलाची प्रदक्षिणा काढुन मिरवणूक काढत असतात. पण आता वाढत चाललेल्या कोरोना संर्सगामुळे सण ऊत्सवावरही संकट ओढवलंय.

लातुर जिल्ह्यात व तालुका परिसरात कोरोनाचे रूग्न सापडल्याने पोळा सणाला देखील बंदी घातल्याने शेतकऱ्यांचा हिरमोड झाला आहे. तसेच पोळ्याला मारोती मंदिराला प्रदक्षिणा व मिरवणूकीस परवानगी नाही असेही प्रशासनाचे वतीने सांगण्यात येत आहे.

त्यामुळे बैलाचे सामूहिक पूजन न करता घरी व शेतशिवारातच पोळा सण साजरा करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच कोणीही शासनाच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करणा-यांविरुद्ध गुन्हे दाखल होणार असल्याचा इशारा देखील देण्यात आला आहे.

MahaBulletin Team

Share
Published by
MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 07 Sep 2026

रविवार, ६ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 कामगार…

3 days ago

MahaBulletin — 06 Sep 2026

शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

4 days ago

MahaBulletin — 05 Sep 2026

गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

5 days ago

MahaBulletin — 03 Sep 2026

मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…

7 days ago

MahaBulletin — 01 Sep 2026

सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…

1 week ago

MahaBulletin — 31 Aug 2026

रविवार, ३० ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघातांची…

1 week ago

This website uses cookies.