शैक्षणिक

पी. के. इंटरनॅशनल स्कूलच्या दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल शंभर टक्के : क्रीडा व सांस्कृतिक उपक्रमांत देखील यश

यश देशपांडे

साक्षी भिंगारदिवे
दुर्गेश पाटील
महाबुलेटीन नेटवर्क / प्रतिनिधी
चाकण : नुकत्याच सी. बी. एस. ई बोर्डाने जाहीर केलेल्या दहावीच्या निकालामध्ये चाकण येथील पी. के. फाऊंडेशन संचलित पी. के. इंटरनॅशनल स्कूल या विद्यालयाने 100% निकालाची परंपरा यावर्षी देखील कायम ठेवली असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रतापराव खांडेभराड व सचिव नंदाताई खांडेभराड यांनी दिली.
तसेच पी. के. इंटरनॅशनल स्कूल मधील विद्यार्थ्यांनी कराटे क्रीडा प्रकारात मिळविलेल्या राज्यस्तरीय यशाबरोबरच भोसरी येथील प्रसिद्ध इंद्रायणी थडी उत्सव नृत्यस्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना प्राचार्या सई तिकोने, उपप्राचार्य प्रशांत बावधनकर, संस्था प्रतिनिधी कु. निकिता खांडेभराड व सर्व शिक्षक यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
इयत्ता दहावीच्या परीक्षेत प्रथम पाच क्रमांक मिळविलेले विद्यार्थी पुढील प्रमाणे :-
प्रथम क्रमांक- यश नितीन देशपांडे : 89.20 टक्के,
द्वितीय क्रमांक- साक्षी विनोद भिंगारदिवे : 85.20 टक्के,
तृतीय क्रमांक- दुर्गेश भीमराव पाटील : 84.00 टक्के,
चतुर्थ क्रमांक-धीरज प्रवीण चौधरी 80.60 टक्के,
पाचवा क्रमांक- तन्मय रामदास आंद्रे : 80.00 टक्के.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना पी. के. फाउंडेशनच्या सर्व शैक्षणिक शाखांच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या.
admin

Recent Posts

MahaBulletin — 03 Aug 2026

रविवार, २ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 💧 धरण…

7 minutes ago

MahaBulletin — 02 Aug 2026

शुक्रवार, ३१ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 आज…

1 day ago

MahaBulletin — 31 Jul 2026

गुरुवार, ३० जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 खेडमध्ये…

3 days ago

MahaBulletin — 29 Jul 2026

मंगळवार, २८ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 खेड…

5 days ago

MahaBulletin — 27 Jul 2026

रविवार, २६ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 नीट…

1 week ago

MahaBulletin — 26 Jul 2026

शनिवार, २५ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 💧 खेडमध्ये…

1 week ago

This website uses cookies.